निर्भिड प्रतिनिधी
पाटण प्रतिनिधी, पांडुरंग लोहार
पाटण बस स्थानकाच्या नुतणीकरण झालेल्या भूमिपूजनास राज्याचे परिवहनमंत्री व शिवसेना नेते मा.दिवाकर रावते पाटण मधे आले होते या वेळी झालेल्या स्वागत समारंभावेळी सातारा जिल्हा शिव सेनेचे अध्यक्ष मा हर्षद कदम यांचे स्वागत न झाल्याने शिवसैनिकामधे नाराजी पसरली असून जिल्हा अध्यक्षाचा झालेला अपमान कट्टर शिवसैनिकाना पचला नाही. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्षाचे नामोउल्लेख नसने ही खेदाची बाब असून ज्यानी जिल्ह्यातील शिवसेना वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न केले त्यांचे नावाचा ऊल्लेख शिवसेनेच्या नेते मंडळी समोर नसणे यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होतो. खरचं नजर चूकीने नामोउल्लेख राहीला का ? जाणून बूजून कोणाच्या सांगण्यावरून राहीला हे पहाणे गरजेचे आहे. आमदार व अध्यक्ष या दोघामधील वाढत चाललेल्या दरीचे हे प्रतीक तर नाही ना ? काहीही असो पण या विषयाची चर्चा मात्र तालुक्यात चांगलीच रंगलेली दिसत आहे हे माञ नक्कीच!



















