फलटण : (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) दि.९/०७/२०१८ तालुक्यातील सरडे बंगाला येथील जिल्हा परिषद शाळे मधे निर्भिड पत्रकार उपसंपादक गोविंद मोरे यांच्या वतीने वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची प्रारंभ सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,प्रथम बोधिवृक्ष रोपण करण्यात आला. या वृक्षारोपन मधे गुलमोहर , कंरज, लिंब, शिवन, अशोका सह असंख्य वृक्षांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमास पोलिस उप-निरीक्षक बोंबले साहेब बरड, रासकर साहेब बरड, हराळेसर मुख्यध्यापक, सायकरसर, प्रदीप मोरे शाळा कमिटी अध्यक्ष, दत्ता भोसले सरपंच सरडे, संदीप हुळहुळे तलाठी, कोकरे ग्रामसेवक, रणवरेसर केंद्र प्रमुख, सुखदेव बेलदार मा.सरपंच, सुनील मोरे मुंबई पोलिस,संकल्प फौडेंशन अध्यक्ष अनिल चव्हान, उपध्यक्ष सोमनाथ रणदिवे, बिपीन बागाव, अमोल लोंढे, किरण रणदिवे, अमोल रणदिवे निर्भिड पत्रकार प्रतिनिधी सह आदी ग्रामस्त उपस्थित होते.



















