फलटण : (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) दि.१७.०७.१८ येथील सरडे गावामध्ये वाळू माफिया हे गावातून वाहणाऱ्या नीरा नदी व गावातील ओढ्याच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू, माती व मुरूम याचे अवैधरित्या खणण करत आहेत.वाळु माफियांच्या या बेकायदेशीर उद्योगामुळे नदी व ओढा पात्राची अक्षरशः चाळण झाली आहे.हा प्रकार दिवसाढवळ्या राजरोसपणे चालू आहे.या प्रकाराकडे शासनाचे मात्र अक्षम्य असे दूर्लक्ष झाले असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्या कृष्ण कृत्यात प्रसासन देखील सामील आहे का असा प्रश्न स्थानिकांना पडत आहे.प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे शासनाचा महसूल तर बुडत आहेच शिवाय पर्यावरणाची अपरिमीत हानी होत आहे. वाळू माफियांच्या या अवैध धंद्यावर जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी व तहसिलदार कारवाई करणार का हा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे.



















