चंद्रपुर (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी-विकास खोब्रागडे
चिमूर तालुक्यातील पळसगाव मधील गरीब कुटुंबातील राजेंद्र चौधरी यांची मुलगी राधिका वय ५ वर्षे आपल्या आजी सोबत झोपली असता अचानक उजव्या हाताच्या बोटाला सापाने दंश केल्याने जागी झाली व आपल्या आजीला काटा टोचल्याचे सांगू लागली. बोटाला झालेली जख्म पाहून आजीने लगेच अंथरुन उचलून पाहता विषारी साप आढळून आला. लगेच वैद्या कडून औषध देऊन उपचार सुरु केले पण त्याचा काही फरक पडला नाही. व रात्री २.३० दरम्यान राधिकाची प्राणज्योत मावळली. गावातील वृद्ध जानकर लोकांच्या मते आजपर्यन्त सर्पदंशाने मृत्यूची ही गावातील पहिली घटना आहे अशी माहिती निर्भिड पत्रकार प्रतिनिधीना दिली.चौधरी कुटुंब हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असून घरची परस्थिती हलाकीची आहे.त्या मुळे या परिवरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ यक्त केली जात आहे.



















