फलटण (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
तालुक्यातील सरडे गावातील नदी किनारील शेतातील माती उत्खनन जेसीबी च्या सहायाने करून विट्ट कारखानदारास विकण्याचा धंदा मोठ्या जोमत सुरु आहे. सदर माती वाहून नेहण्यासाठी रस्ता ही वाळू, खडवान टाकून बनविण्यात येत आहे. या कडे मात्र महसुल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे. या महसुल विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे वाळू व माती माफियाचे चांगलेच फावत असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकाराकडे संबधित आधिकार्याने जातीने लक्ष घालून माती व वाळू माफिया वर कायदेशीर कारवाही करून सरडे गावातील शेतीचे सरंक्षण करावे अशी मागणी ग्रामस्ताकडून करण्यात येत आहे.



















