पाटण (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी – पांडुरंग लोहार
नाडोली गावच्या हद्दीत असणारे स्टोन क्रेशर या स्टोनक्रेशर मूळे नाडोलीचा डोंगर पूर्ण पोखरून निघाला आहे.सूरूंग लावला तर घरे अक्षरशः हालत आहेत. त्यामूळे स्टोनक्रेशर नाडोलीगावात पण गाव जाणार बाराचे भावात अशी अवस्था झाली आहे.पाटणतालुक्याच्या डोंगराच्या कुशीत वसलेले हे नाडोली गाव आहे या गावातिल लोक मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत.या गावाला तीन वाडया असून या लोकांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी करून काही परगावातील लोकांनी व्यवसाय ऊभा केला आहे. सुरूवातीला पैशाची चणचण भासणारी ही भोळीभाबडी जनता त्यांच्या जमिनीत ऊभे राहिलेली स्टोनक्रेशर आज गावाच्या मूळावर ऊठली आहेत. विकत घेतलेल्या जमिनीवर स्टोनक्रेशर चालू आहेत. आणखी श्री मल्हारस्वामी देवसथान ट्रस्ट या ईनामी जमिनीत अतिक्रमण चालू आहे. या क्रेशरमूळे हादणारा डोंगर यामूळे घरांना जाणारे तडे क्रेशरच्या ऊडणारी धूळ यामूळे शेतीचे होणारे नूकसान या गोष्टी आज ग्रामस्थाच्या लक्षात येत आहेत पण करणार काय ? भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था झाली आहे. खरचं शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. एवढ्या छोट्याशा गावात चालणारी स्टोनक्रेशर बघितली की वाटतं एक दिवस नाडोली गाव दूसरे माळीण गाव झाल्याशीवाय राहणार नाही स्टोनक्रेशर वर लावले जाणारे मोठे सुंरूग त्याच्या स्फोटाने अक्षरशा धरणीमातेचा थरकाप होतोय. डोंगरदऱ्यातून घूमणारा स्फोटाचा आवाज यामुळे शांत बसलेला डोंगरही आता कूठेही कोसळत आहे. या स्फोटाने हारूगडेवाडी,डिगेवाडी,मधलीवाडी येथील घरांना तडे गेले आहेत.सुरुंगाचा स्फोट झाला की लोकांना भूकंप झाल्याचा भास होतो भीतीने लोक घराबाहेर पडतात. या गावात पूरातन असे श्री दत्तात्रय देवाचे मंदिर आहे. या देवाची मल्हारस्वामी देवसथान टस्टृ आहे या टस्टृची जमीन या डोंगरात आहे या देवसथान जमिनीतही अतिक्रमण झाले आहे. या सगळ्या गोष्टीचा करता क्रेशरवाल्यांना अभय कोणाचे ? शासनाचे का ग्रामपंचायतीचे क्रेशरमधून दररोज मिळणारे ऊत्पादन व शासनाला जाणारी रायॅलटी यात जमीन आसमानचा फरक आहे. तरीही शासन यांना अभय का देतय हा प्रश्न महत्वाचा आहे. खरंतर या गोष्टीचा अनुभव घेण्याकरता शासनाने आपले प्रतिनिधी या गावात चार दिवस राहायला पाठवले पाहीजेत. मालाने भरलेले अवजड वाहने खराब रस्ता याच रस्त्यांवर जीव मूठीत घेऊन जाणारी भोळीभाबडी जनता यांना असे वाटते कि कधी संपणार हा नाडोलीचा वनवास ? या सगळ्या गोष्टीचा विचारकरता शासन यांचा गाभीयाने विचार करेल का व गावाला वाचविल का? अशा अनेक प्रश्नाचे ओझे डोक्यावर घेऊन नाडोलीचे ग्रामस्थ आहेत.शासन राजा जागा हो व नाडोली वाचवा अशी हाक ग्रामस्थ देत आहेत.त्यातच एल एन टी सारखी मोठी कंपनी याच गावात पण कामगार बाहेरचे या गावातील बेरोजगार तरुण मोलमजुरी साठी १८ तास बाहेर म्हणजे पूढयात भरलेले ताट तरीही पोट मात्र सपाट अशीअवस्था झालीआहे. ठराविक लोकांच्या फायदयासाठी एका गावाचा बळी जातोय याचा शासनस्तरावर विचार होऊन गावाला न्याय मिळावा हीच अपेक्षा !



















