बीड ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) आष्टी प्रतिनिधी: प्रफुल्लकुमार जाधव
जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी काही समाज कंटकानि आरक्षण व दलित अत्याचार प्रतिबंधककायदद्याचा निषेध करत भारतीय संविधानाचा अपमान केला आहे भारतीय संविधानाचा अपमान करणे म्हणजे देश द्रोही करणे ज्या संघटनेच्या वतीने हे करण्यात आले। त्याच्यावर सर्व पोलीस ठाण्यामध्ये व सायबर गुन्हे शाखेकडे देश द्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दिपक भैया गरुड यांनी तहसिलदार रामेश्वर गोरे यांना निवेदन देवून तीव्र निषेध केला. यावेळी आष्टी तालुका अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका कार्यध्यक्ष आशोक जाधव,चर्मकार समाजाचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ सातपुते, अक्षय घोडके संतोष जाधव,निलेश जाधव अक्षय गरुड यांनी निवेदन दिले.यावेळी आदी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.



















