फलटण ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी,
तालुक्यातील गूणवरे गावातील कै. संजय गांधी विद्यालय मधील शोचालय गेली काही महिने झाले अत्यंत दयनीय अवस्थेत होती आणि आता तर ती शौचालय भुसपाट झाली आहे. मंगळवार दि. ७ ऑगस्ट १८ रोजी शौचालय पूर्णपणे पडल्याने विद्यार्थ्यांची खूपच गैरसोय होत असल्याचे जाणवत आहे, विध्यार्थ्याना लघुशंका साठी शाळेपासून खूपच दूर अंतरावर उघड्यावर जावे लागत आहे परिणामी खूप गैरसोय होत असून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे. हि गैरसोय जाणून घेत दूर करण्यासाठी निर्भिड पत्रकारचे प्रतिनिधी मनोज भोसले यांनी प्रिंसिंपल मा. घाटगेसर यांच्याकडे लेखी अर्ज करून त्वरित लक्ष देऊन विद्यार्थ्यांसाठी मुतारी व शौचालयाची सोय करावी अशी विनंती केली आहे.



















