सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,अनिल माने
पाटण, त्रिपुडी येथील शेतकऱ्यांचे रानडुक्करारांनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानडुक्कर रात्रीच्या सुमारास शेतातील पीक खात असल्याने शेतकरी पाऊसाचे दिवस असल्याने शेतकरी रात्री शेतामध्ये जाऊ शकत नसल्याने रानडुक्करांणी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रानडुक्कर ऊसाचे पीक अर्धवट खात असल्याने उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रानडुक्कर ऊसामध्ये लोळन घेत असल्याने जमिनीचे सुध्दा नुकसान होताना दिसते.डोंगराळ भाग असल्याने डुक्करांचा या ठिकाणी थैमान झाला आहे आणि एखाद्या शेतकऱ्यांचे नुकसान करताना डुक्करांनचा कळप शेतात जाऊन शेतीचे नुकसान करत आहे.व शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहे.पाटण तालुक्यामध्ये पाऊसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतीच्या पीकामध्ये घट होते अशा या संकटात शेतकरी असतांना दूसरीकडे रानडुक्करांणी अक्षरशः शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे. शेतकऱ्यांना जगावे की मरावे हाच प्रश्न डोळ्याफूडे उभा राहीला आहे.
त्रिपुडी येथील शेतकरी वर्गातून वनविभागाकडे मागणी होत आहे की आमच्या शेतीचे रानडुक्करांणी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जवळ-जवळ शेतीचे एक एक एकरामध्ये नुकसान झाले आहे.तरी जे नुकसान झाले आहे त्याची संभंधित वनविभागाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्यात यावी व डुक्करांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी शेतकऱ्यांकडुन मागणी होत आहे.



















