चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि. -२१/०८/२०१८
चिमूर :- चिमूर येथील नवनिर्मित उप विभागीय पोलिस अधिकारी(S.D.P.O) मारोती विठ्ठल इंगवले यांची कार्यालयाला अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण चिमूर तालुक्यात जनतेस तथा पोलिस विभागास आनंदाची वार्ता असून सगळीकडे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नाने हे शक्य होऊ शकले यामुळे संपूर्ण चिमूर येथे प्रथमच उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून श्री मारोती विठ्ठल इंगवले (पोलीस उपअधीक्षक मुख्यालय चंद्रपूर ) यांची चिमूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राज्य शासनाच्या गृह विभागाने नियुक्ती केली आहे व यात चिमूर , शेगाव व भिसी या तिन्ही पोलीस स्टेशन चे समायोजन या चिमूर पोलिस उप विभागीय कार्यालयात करण्यात आले आहे हि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वांत मोठी आनंदाची बाब आहे.



















