चंद्रपुर (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२३/०८/२०१८ नागभीड तालुका, नागभीड येथे गोवर्धन वार्डात चंद्रपूर जिल्हातील संगणक परीचालकाच्या अथक परिश्रमातून समृद्ध महाराष्ट्र क्रेडिट को ऑपरेटिव्ह ली. चंद्रपूर या पतसंस्था चे स्थापना करण्यात आली असून त्या सोसायटीचा लोकार्पण सोहळा दि.२२/८/२०१८ला हजारो संगणक परीचालकाच्या उपस्थिती मध्ये शिक्षक सोसायटी नागभीड येथे पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उदघाटक,जितेंद्र साखरे,जिल्हा अद्यक्ष गोंदिया,नवणीत बेहरे,भंडारा,आंबोरकर,अमृतकर,राटोड, महाराष्ट्र जिल्यातील जिल्हाध्यक्ष देवेंद्र गेडाम, विदर्भ अध्यक्ष तथा चंद्रपूर अध्यक्ष स.प.संघटना,यांच्या अध्यक्षते खाली सदर सोसायटीचा लोकार्पण सोहळा पार पडला असून सदर विचारमंचावरून सोसायटीचा माध्यमातून आपला भविष्याचा विचार करायचा आहे. संघटन आणि सघटना या विषयांवरसुद्धा प्रकाश टाकण्यात आला. राजकारण न करता शेवटच्या संगणक परिचालक ला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली. मंचावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षय भाषणात गेडाम यांनी सोसायटीचा मूळ उद्देश काय. सर्व संगणक परीचारिकाच्या परिश्रमाचा हा विजय आहे.सर्वांनी पुढची दिशा ओळखून संघटित राहाने काळाची गरज आहे. काही कारणास्तव नियोजित पाहुणे आले नाही त्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. अल्पोहारच्या कार्यकमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संचालन धनराज रामटेके जिल्हा सचिव सगणक परिचालक संघटना चंद्रपूर जिल्हा,आभार प्रदर्शन आशिष मोहूर्ले कोरपना अध्यक्ष सदर लोकार्पण सोहळ्यास प्रतीक नळे,संजुभाऊ दरवडे ,प्रमोद मेश्राम,आकाश शामकुरे,शैलेंद्र पाटील,देवेंद्र मुन,संजय शेडामे,देवा ननावरे,प्रशांत डवले ता,अध्यक्ष,प्रशांत सोनकुसरे, प्रवीण मुंडरे,प्रमोद धुर्वे,विकास खोब्रागडे व जिल्ह्याभरातून आलेले संगणक परिचालक उपस्थित होते.



















