सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,मनोज भोसले
दि. २३/११/१८
फलटण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या फलटण आगारातील कर्मचारी अत्यंत गहाळ पद्धतीने कामकाज चालवत असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे फलटण तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून महामंडळाने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोफत पास योजना राबवली आहे, त्याबद्दल शाळकरी विध्यार्थ्यांनी आणि पालकांनी महामंडळाचे आभार ही मानले, पण.. दुसरीकडे विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैरसोयीमुळे विद्यार्थी वर्ग नाराज असल्याचे दिसून येत आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांना जो मासिक सवलतीचा मोफत पास दिला जात आहे तो पास काढण्याकरिता विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या असतात, पास काढण्या साठी खूप गर्दी असते पण तरी देखील येथील कर्मचारी गहाळ पद्धतीने कामकाज करत असतात पास काढतेवेळी विद्यार्थ्यांना ताटकळत तासन तास उभे राहावे लागत आहे. पास काढण्याच्या ठिकाणी उन्हा पासून सौरक्षण होण्यासाठी त्याठिकाणी निवारा ही नाही, आणि कर्मचाऱ्यांच्या गहाळ कामकाजामुळे विद्यार्थ्यांची खूपच गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.
आगारातील कर्मचाऱ्यांच्या गहाळ कामकाजाबद्दल येथील आगार प्रमुख (व्यवस्थापक) गांभीर्याने विचार करत आहेत का नाही? असा प्रश्न विध्यार्थी आणि पालक वर्गामध्ये उपस्थित झाला आहे.



















