सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,पांडुरंग लोहार
दि.४/१२/१८
पाटण, नाडोली गावात असणारी स्टोनक्रेशर त्याचे होणारे अतिक्रमण याविषयी अनेक वेळा नाडोली गावाने तक्रारी दाखल करून सुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारची चौकशी न करता स्टोनक्रेशरवाले यांचे वरच कृपादृष्टि ठेवली आहे. म्हणून तर आज म्हणू लागलेत की आमचे वरतीपर्यंत हात नाडोलीगावाला आम्ही भीत नाही.
नाडोली सारख्या खेडेगावातील लोकांच्या जमिनी कवडीमोलाचा दराने खरेदी करून या लोकांनी आपले स्टोनक्रेशर चालू केले नंतर देवस्थान रानात गायरानात अतिक्रमण याविषयी शासनाकडे अनेक वेळा तक्रारीदाखल केली पण याकडे शासन लक्ष देत नाही.
स्टोनक्रेशरच्या सुरुंगाने खिळखिळी झालेली घरे तसेच अवजड वाहनांनी रस्त्याची झालेली दुर्वास्था याविषयी शासनाकडे अनेकवेळा तक्रारी दाखल केली पण शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.या स्टोन क्रेशरमूळे होणारी धूळ रस्त्याची धूळ यामूळे गावातील लोकांची आरोग्य ही धोकादायक होवू लागले आहे.गावाला दोनी बाजूनी स्टोनक्रेशर चा विळखा पडला आहे यातून गावाला कोण वाचवणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
नाडोली गावचे ग्रामस्थ जाधव यांनी तहसिलदार याच्याकडे माहितीचा अधिकार या अधिकाराखाली माहिती मागवली पण तीही माहिती दिली नाही. त्यातच २० वर्षे झाली ग्रामपंचायत कडून ना हारकत दाखले घेऊन चाललेली स्टोनक्रेशर आज अचानक ग्रामपंचायती मध्ये शेडाची नोंदकरावी म्हणून ग्रामपंचायतकडे मागणी करु लागले आहेत. पाटणचे गटविकास अधिकारी यांनीही तसाच आदेश दिला आहे मग या शेडाची नोंद वीस वर्षे का झाली नाही? ‘ग्रामपंचायत कर का बुडवला? आत्ताच ग्रामपंचायत मध्ये स्टोनक्रेशर च्या शेडाची नोंद करावी असा घाट का घातला जातोय? या विषयी ग्रामस्थांना सविस्तर माहिती अधिकारी यांनी द्यावी. लोकांमधील संभ्रम दूर करावा खरोखर शासनाच्या आदेश की आणखी काय?कारण आजअखेर एवढ्या तक्रारी जाऊन प्रशासनाने कोणतीही कारवाई का केली नाही? मग यांना अभय कोणाचे ? यामुळे तर ही म्हणत नाहीत ना आमचे वरती पर्यन्त हात,नाडोली गावाला आम्ही नाही भीत. असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.



















