सातारा ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, गणेश शिंदे
दि.८/१२/१८
पाटण, पाटण तालुक्यासारख्या दुर्गम डोंगराळ भागात गेली ५० वर्ष ज्ञानदानाचे कार्य कोयना शिक्षण संस्था करत आहे. त्यामुळे या ग्रामिण भागाचा बहुआयामी विकास होत आहे. या निस्वार्थ भावनेने कार्य करणारी संस्था उत्तम संस्कारीक नागरीक घडविण्याचे केद्र आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांनी केले ते संस्थेच्या अमृतमहोत्सव सांगता समारंभात बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास कोयना शिक्षण संस्थेतील अध्यक्ष,डाॅ. सोपानराव चव्हाण उपाध्यक्ष, प्रकाशभाऊ पाटील, जनरल सेक्रटरी अमरसिंह पाटणकर, जाॅईट सेक्रटरी बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ सदस्य हणमंतराव जाधव, सदस्य साहेबराव देषमुख, संजीव चव्हाण, पृथ्वीराज पाटील, डाॅ. प्रल्हाद चव्हाण, शिलासिंग राजेमहाडिक, डाॅ. सिमा चव्हाण, डाॅ. सुहास देषमुख आणि सर्व सदस्य, प्राचार्य, डाॅ. एस. डी. पवार कोयना शिक्षण संस्थेतील सर्व शाखामधील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.देवानंद शिंदे पुढे म्हणाले की, ग्रामीण, वंचित, डोंगरी भागातील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांच्या जडण घडणीमध्ये संस्थचे योगदान आहे मुलांच्या मध्ये शिक्षण, संस्कार, आरोग्य, कौषल्या निर्माण करण्याचे काम संस्था अविरहीत करत आहे. संस्थेचे हे कार्य ग्रामिण भागातील आणि देशाच्या प्रगतीमध्ये थेट योगदान देणारे आहे. व्यक्ती मुल्ये व समाज मुल्याही वेगळी नसून एक असतात. त्याची जोपासना करणे हे भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. त्याची जोपासणा करण्यासाठी शिक्षण प्रणालीमध्ये कार्यरत असणा-या प्रत्येक घटकाने सजग राहीले पाहिजे. संशोधन, तंत्रज्ञान कौशल्य व व्यवस्थापन यामध्ये शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यानी पारंगत झाल्यास समाज उन्नत होतो. इंटरनेट हे एक वरदान आहे पंरतु त्याचा उपयुक्त वापर न केल्यास घातक ठरू शकते. म्हणून इंटरनेटचा सजगतेने वापर करावा. जीवनामध्ये सकारात्मक दृष्टीकोणास महत्वाचा आहे. दृष्टीमुळे सृष्टी बदलू शकते म्हणून सकारात्क दृष्टीकोणातून पहावे कोयना शिक्षण संस्थेचा ज्ञानदानाचा हा सुर्वण वसा पुढच्या पिढीनेही घ्यावा असे अवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये प्राचार्य डाॅ.यशवंतराव पाटणे यांनी शिक्षण आणि मुल्य संवर्धन याविषयावर बोलताना म्हणाले की माणुस, राष्ट्र आणि चारित्र घडविण्याचे शिक्षण संस्था देत आहे. ज्ञान आणि श्रमाचे नाते संस्थेने जोडून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल केले आहे. खऱ्या अर्थाने ही संस्था मुल्य शिक्षाणाची तिर्थ क्षेत्र आहे. संस्था प्रकाशाचे देवूळ आहे. आकाश जाणून घ्यायचे असेल तर वाऱ्या प्रमाणे मुक्त होवून चालत नाही. दिव्याप्रमाणे भक्त होवून जगावे लागते. संस्थेेने आपल्या दिव्याच्या प्रकाशाने पाटण तालुक्याला अंधार मुक्त करून आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. ध्येयवादी शिक्षक व गुणवंत विद्यार्थी ही संस्थेची मिळकत आहे. ज्ञानोबा तुकोबांनी मानवता धर्माची संकल्पना मांडून धर्मांधपणातून समाजाला मुक्त केले. आपल्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करा त्याची अभिरूची ओळखून त्यांचा अंगी असणाऱ्या सुप्तगुणांना चालना दया. संस्थेतील ग्रंथाालय ही ज्ञानाची उपासणा करणारी ज्ञानपीठ आहेत. ग्रंथ चांगल्या मुल्यांचा संस्कार करतात म्हणून ग्रंथाच्या सानिध्यात जा असे विचार व्यक्त केले.तसेच केायना शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत सेवानिवृत्त झोलल्या प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांचा या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभात मध्ये सत्कार करण्यात आला तसेच चालू शैक्षिणक वर्षात विशेष प्राविण्य प्राप्त सेवकांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. सोपानराव चव्हाण यांनी केले तर आभार प्राचार्य डाॅ. एस. डी. पवार यांनी मानले तर कार्यकामचे सुत्रसंचालन प्रा.डाॅ. दिपक डांगे पाटील, प्रा. विनायक राऊत, प्रा. पौर्णिमा मोरे यांनी केले.



















