मुंबई (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,मिलिंद जाधव
दि.१४/१२/१८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध भाषिक चैत्यभूमीवर येत असतात.चैत्यभूमीवर येणाऱ्या सर्व अनुयायांची योग्य सोय व्हावी म्हणून विविध उपक्रम राबिविले जातात. यामधील एक वेगळा उपक्रम सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप हा उपक्रम मुंबई व नागपूर येथील तरुण, तरुणी यांनी एकत्रित येऊन राबवित सामाजिक भान राखत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.दैनंदिन जीवनात महिलांचे आरोग्य व त्यासाठी घ्यावयाची काळजी ही खूप महत्वाची ठरते. म्हणून समाजाची सेवा करावी या उद्देशाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे ५ ते ६ डिसेंबर या दिवशी आलेल्या मुली व महिलांना मासिकपाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्सच बद्दल माहीती देत १० हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप यावेळी करण्यात आले.स्वाती भालेराव,आम्रपाली जाधव ,वैशाली भालेराव यांनी तयार केलेल्या का पुस्तिकेच्या मदतीने मासिकपाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्स बदल महिलांची भेट घेऊन त्यांना त्या बद्दल माहिती देण्यात आली. तर आम्रपाली जाधव यांनी हिंदी भाषिक महिला आणि मुलींना माहिती दिली.वैद्यकीय दृष्टया मासीक पाळी बद्दल जी महत्वाची माहिती महिलांपर्यंत पोहचली पाहिजे याबद्दल डॉ. पल्लवी कांबळे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मुंबईतील वैशाली भालेराव, आम्रपाली जाधव, स्वाती भालेराव,प्रीती गांगुर्डे,मोनिका वानखेडे,ह्या सहभागी झाल्या होत्या तर नागपूरच्या मेघा वानखेडे,उर्वशी फुलझुले,अनिकेत कुतरमारे, पंकज वासनिक राहुल सोमकुवार, पियुष बेले ,प्रतीक मेश्राम निलेश वाळवी,निलेश बागडे,प्रमोद वासनिक, फिलिप्स सचिन बारहाते तर आदी सहभागी झाले होते. यावेळी Own media तर आदींचे सहकार्य यावेळी लाभले.आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, आणि देशातील प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असून समाजाची सेवा सेवा करणे ही काळाची गरज आहे. असे सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप उपक्रमात सहभागी झालेल्या युवतींनी बोलतांना सांगितले.



















