सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४/१२/१८
महाबळेश्वर येथील व्हॅली व्ह्यूव रिसॉर्टच्या बाजूला असणाऱ्या झोपड्याना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत ५ झोपड्या जळून खाक झाल्या. महाबळेश्वर नगरपालिकेच्या अग्निशामक दल व नागरिकांच्या तब्बल ३ तास अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.भीमराव बडगे,सिद्धम्मा कल्ली, श्रावण बिरादर, शिवराज बडगे,मोहन कारंडे यांच्या पत्रावजा झोपड्या आगीत बेचिराख झाल्या.नगर पालिका व महसूल प्रशासनाने मात्र पीडितांना अजून कसल्याही स्वरूपाची मदत दिली नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तथापि स्थानिक दानशूर व्यक्तींनी पीडितांना जमेल त्या स्वरूपात मदत दिली असून ती बहुमोल आहेच पण अपुर्ण आहे. सर्व पीडित शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत.



















