सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,पांडुरंग लोहार
दि.६/१/१९
पाटण, संबंधीत ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची समज न देता त्या ग्रामपंचायत हद्दीमधे अवैद्यरित्या खडीक्रेशर चालू कसा काय या बाबत नाडॊली ग्रामपंचायतीने प्रशासनाकडून मागितली महिती प्रशासनाकडून खुलासा संबंधीत ग्रामपंचायतीची नाहरकत संमती घेतल्या शिवाय खडी क्रेशरला परवानगी कशी काय देण्यात आली?अंदाजे १००-१५० फूट अंतरावर असणारा जलस्वराज्य योजनेतून करण्यात आलेला बंदारा याच बंदाऱ्याजवळच खडी क्रेशर वाल्यांचा अनाधिकृत व्यवसाय चालू आहे. जलस्वराज्य बंदारा हा या खडी क्रेशरमुळे मूजलेला आहे त्याच बरोबर या बंदाऱ्याला छोट मोट्या भेगा पडलेल्या आहेत.खडी क्रेशर चालू होण्यापूर्वी नाडॊली हे गाव गुण्यागोविंदाने नांदत होत शेतीमुळे शेतात चांगले पीक पिकत होते त्यातून शेतकऱ्याला मुबलक असा फायदा होत होता. यातून शेतकरी आपले घर चालवत होता तसेच मुलाबाळांचा शालेय खर्च भागवत होता. शेती पिकत असल्यामुळे पशुधन शेतकऱ्यांनकडे मोठ्याप्रमाणात पशुधन होते पशुधनमुळे दुग्धव्यवसायाला चांगली साथ मिळत होती व चार पैसे सुद्धा या दुग्धव्यवसायामुळे मिळत होते परंतु नाडॊली गावात खडी क्रेशर व्यवसाय सुरू झाला अन नाडॊली गावाचे दुष्काळात रूपांतर झाले आणी नाडॊली गावातील शेतकरी वर्ग डबगाला आला. ज्या शेतीतून पीक पिकत होत त्या शेतीतून आज पीक नव्हे तर साध त्या शेतात गवत चारा सुद्धा उगवत नाही तर पीक काय उगवणार.खडी क्रेशरमुळे होणाऱ्या धुळीमुळे तसेच बोअर ब्लास्ट मुळे शेतीचे नुकसान तर झालेच परंतु यामुळे घरांना तडे जाणे त्याचबरोबर पाण्याचे स्त्रोत कमी झाले आणी जवळपास कोयना नदी असून सुद्धा या नाडॊली गावाला काही वेळा पाण्याच्या टँकरने पाणी गावात न्यावे लागत आहे.कोयनाधरणाचे पाणी जर कर्नाटक व महाराष्ट्रबर जर पाणी जात असेल तर नाडॊली सारख्या छोट्याशा गावामध्ये का जाऊ शकत नाही असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनमधे उपस्थित होत आहेत.अखेर याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नाडॊली येथील खडी क्रेशर वर सील लावले व काम बंद पाडले.



















