सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.१३/१/१९
सातारा जिल्हा युवा विध्यार्थी सामजिक संघटनेमार्फत राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पाटण येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हावशी येथे संपन्न झाला. यावेळी सातारा जिल्हा युवा विध्यार्थी सामजिक संघटनेच्या वतीने पुष्प अर्पण करण्यात आले.यावेळी सातारा जिल्हा युवा विध्यार्थी सामजिक संघटनेचे अध्यक्ष मा.शुभमजी उबाळे साहेब बोलले की आपण महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी करत असताना आपण आपल्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणी राजमाता जिजाऊ यांच्या नाहक बदनामी करणाऱ्या राजेंद्र शास्त्री या लेखकाने जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी असल्याचा लातूर येथील ११ वी संस्कृत सारिका लातूरच्या निकिता पब्लिकेशनच्या पुस्तकात वादग्रस्त उल्लेख करण्यात आला.युवा विध्यार्थी संघटनेच्या वतीने हे वादग्रस्त पुस्तक लिहणाऱ्या राजेंद्र शास्त्री या लेखकाचा जाहीर निषेध करण्यात आला. लेखकाने लिहलेले पुस्तक बंद करण्यात यावे अशी मागणी सुद्धा सातारा जिल्हा युवा विध्यार्थी सामजिक संघटनेमार्फत करण्यात आली. ते म्हणाले आपल्या बहुजन राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या समाजकंटक यांच्या विरोधात आवाज उठवन गरजेचे आहे,परंतु आत्ताचा तरुण युवा वर्ग जर आपण बगीतला तर कोणत्या मार्गावर जातोय आणी काय करतोय.या पुढे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बहुजन राष्ट्रपुरुषांची कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न जरी केला तर सातारा जिल्हा युवा विध्यार्थी सामजिक संघटना समाजकंटकांच्या विरोधात मोठा लढा उभा करेल राजमाता जिजाऊ तसेच सर्व बहुजन राष्ट्रपुरुषांचे विचार तरुणांनी बहुजन समाजामधे जाऊन तळातळापर्यंत त्यांचे विचार पोचवणे गरजेच आहे.
सामजिक कार्यकर्ते मा.विजयकुमार गायकवाड यावेळी म्हणाले आपल्या राष्ट्रपुरुषांना बदनाम करण्याचा बुद्धीभेद हजारो वर्षापासून चालत आलेला आहे, ज्या ज्या वेळेला बहुजन समाज जागृत होतो. क्रांतीकडे जातो त्या त्या वेळेला बहुजनांचा बुद्धीभेद करायचा,बहुजनांना या मार्गात आणायच नाही, त्यांना सत्य काय आणी असत्य काय हे समजून द्यायच नाही यासाठी कुणाच कोण कुणाच काय अस बहुजनांच्या राष्ट्रपुरुषांना बदनाम करायच हे त्यांच कार्य आहे असे ते म्हणाले.आज जिजाऊमाता व सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती खटाव तालुक्यामधे गेली २० वर्ष एक दामपत्य करत आहे, ही गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. ते म्हणाले केरळ मधे जे सबरीमाला मंदिर आहे त्या सबरीमाला मंदिरात स्त्रियांना गाबाऱ्यामधे आत जाण्यास बंदी आहे बाईच्या आत जाण्याने विटाळ होत असेल तर तो विटाळ मिटवण्यासाठी पाण्याने धुत असाल तर मग गाभाऱ्यातपर्यंत ज्या ज्या ठिकाणी तिची पाऊले उठली आहेत त्या पाउलाखालची माती सुद्धा विटाळलेली आहे ती माती सुद्धा धुतली पाहिजे तरच खरा विटाळ संपणार आहे.तो विटाळ त्या जागेचाच नाही तर तो विटाळ तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये आहे तुमच्या प्रतेक रक्ताच्या थेंबामधे आहे कारण तुम्ही जन्म स्त्रीच्या पोटी जन्म घेतला म्हणजे तुमच सगळ शरीर भ्रष्ट झालेल आहे, विटाळ झालेल आहे, अपवित्र झालेल आहे. मग शरीराची शुद्धी करणार कशी याच उत्तर आपण कस देणार याचा विचार तुम्ही तरुण आहात म्हणून करायचा आहे ते म्हणाले आत्ता तरुणांचा देश आहे, भविष्यकाळ तुमच्याकडे बघतो आहे. ही तरुण मुल माझ्यासाठी काहीतरी करतील असा भारत देश तुमच्याकडे बघतो आहे. त्यासाठी वैचारिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेच आहे.पृथ्वी,सूर्य, चंद्र, हे जीवन अस्थीत्वात आहे तोपर्यंत बहुजन राष्ट्रपुरुषांच कार्य आभादीत राहणार आहे. कोणीही काहीही लिखाण करू दया सडक्या मेंदूची वृत्तीच तसली आहे फक्त तिचा निषेध करताना आपण वैचारिक दृष्ट्या तितकच स्ट्रॉंग असल पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी सातारा जिल्हा युवा विध्यार्थी सामजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.शुभमजी उबाळे साहेब, उपाध्यक्ष संघटक मा.विकास कदम, सदस्य रोहन माने, संतोष वीर, विशाल कदम, गणेश सूर्यवंशी,किसन लाड, सुरज साळुंखे, सनी माने, वैभव साळुंखे गौरव साळुंखे, आनंदा जाधव, हर्षद साळुंखे, शिवानंद जंगम, विशाल साळुंखे, शुभम दाबाडे, सामजिक कार्यकर्ते मा.विजयकुमार गायकवाड, मा.प्राणलाल माने, मा.विजय थोरवडे, हे सर्वजण उपस्थित होते.



















