चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि.१६/१/१९
चिमूर: तालुक्यातील ग्राम पंचायत पेपरलेस करण्याचा बहुमान मदनापूर,तळोधी,नाईक,खडसंगी,वाहनगांव,खानगांव या ग्राम पंचायत ने पटकावला असून यापुढे ग्राम पंचायत मधील १ ते ३३ नमुना सह सर्व नोंदी व दाखले ग्रामस्थांना ऑनलाईन पध्दतीने मिळणार असल्याने ग्रामपंचायत चा कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे. ग्रामस्थांना जलद व गतिमान सेवा मिळणार असल्याने लोकांचे वेळ व श्रम वाचणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी जाधव साहेब यांनी दिली.ग्रामपंचायत पेपरलेस झाल्याची तपासणी करण्यासाठी गटविकास अधिकारी ग्रामपंचायत मा,जाधव साहेब यांच्या मार्गदर्शना खाली आपले सरकार सेवा केंद्र तालुका वेवस्थापक नंदकिशोर कोरामजी आपले सरकार सेवा केंद्र हार्डवेअर इंजिनियर मेंढे सर, यांनी आपल्या अथक प्रयत्न करून संगणक परीचालकाना मोलाचे मार्गदर्शन केले.या सर्व पेपरलेस ग्राम पंचायत मधील कर्तव्य दक्ष ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी आपल्या प्रामाणिक प्रयन्त करून जिद्द ने आपल्या ग्राम पंचायत पेपरलेस झाली पाहिजे या करिता वेळे प्रसंगी स्वतः जवळील मोबाईल चा वापर करून डेटा अपलोड करून आपल्या कामाप्रति निस्वार्थी काम करून ग्राम पंचायत पेपरलेस करणारे संगणक परिचालक प्रमोद धुर्वे ,अमोल कुबडे,हसपाल पाटील,विजय आत्राम,भाग्यश्री क्षीरसागर यांनी अथक परिश्रम घेतले. ग्रामविकास अधिकारी मा.गुंतीवार सर,रत्नपारखी सर,हुमने सर यांचे मार्गदर्शना खाली व ग्राम पंचायत च्या ग्रामसेवक सर यांचे सहकार्याने सर्व दप्तर ऑनलाईन केलेले आहे.येत्या काही दिसत उर्वरित ग्राम पंचायत सुद्या पेपरलेस होतील.तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत झाल्याने शिरपेचात स्मार्ट ग्राम संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान बरोबरच आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांबद्दल ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य, गट विकास अधिकारी जाधव साहेब,सभापती मा विद्या चौधरी,उपसभापती, मा.शांताराम सेलवटकर यांच्यासह सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.



















