सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,प्रियांका भोकरे
दि.२६/१/१९
सातारा, शिरवळ येथे ग्रामपंचायत कार्यालयात महिला ग्राम सभा घेण्यात आली या ग्राम सभे मध्ये अनेक महत्वपूर्ण विषयावर ठराव मांडण्यात आले. यात बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावात बाल विवाह करणार नाही आणि होऊ देणार नाही,गर्भलिंग चाचणी करणार नाही आणि होऊ देणार नाही,गावात जन्मलेल्या मुलिंचे स्वागत करून त्यांना शिक्षणाच्या सर्व सोई आणि मुलींच्या अस्तित्वाचे व जीविताचे संरक्षण करण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ. राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत मुक्त गाव करू अशी शपथ सर्वांनी घेतली आणि तंबाखु मुळे होणारे आजार विषयीची माहिती ए.एन.एम. यांनी सर्व महिलांना दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजने अंतर्गत झालेल्या सर्व कामाचे वाचन केले. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.शिरवळ ग्रामपंचायती मध्ये डिजिटल सेवा केंद्र स्थापन केले आहे या बद्दल सर्व महिलांना माहिती दिली.या अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व ठराव मांडण्यात आले.या वेळी शिरवळ गावचे ग्रामसेवक,माननीय महिला सरपंच लक्ष्मीताई पानसरे,महिला सदस्या राधिका बेलापूरकर, कविता माने,ज्योती चव्हाण,क्षिरसागर मॅडम,पिसाळ मॅडम गिरे मॅडम,काझी मॅडम आणि शिरवळ गावच्या महिलांनी सहभाग घेतला होता.या ग्रामसभेची सांगता महिला बचत गटाच्या मॅडम यांनी केली.



















