चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०/१/१९
चिमूर,२१ जानेवारी 2018 ला सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील कार्यक्रमात भाजप पक्षाचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी माना समाज व धनगर समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असे आपल्या भाषणात त्यांनी वक्तव्य बोलून दाखवले या वक्त्याने माना समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या मुळे माना समाजात असंतोष पसरला असून खासदार अशोक नेते यांनी जाहीर माफी मागावी असे चिमूर प.स. उपसभापती शांताराम सेलवटकर यांनी आव्हान दिले असून यापुढे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विद्यार्थी आदिवासी माना संघटना चे वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून तहसील कार्यलयासमोर संघटनाचे वतीने घोषणा देत असताना यावेळी उपसभापती शांताराम सेलवटकर यांनी खासदार अशोक नेते यांना आव्हान दिले यावेळी अरविंद सादेकर, विद्यार्थी संघटना माना समाजाचे अध्यक्ष कुलदीप श्रीरामे, देवराव ननावरे, रामदास चौधरी ,चरणदास वाघ , गोविंदराव दांडेकर भाऊराव दांडेकर ,भारती गोडे राहुल दडमल आदी उपस्थित यांनी शिष्टमंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
प.स.उपसभापती शांताराम सेलवटकर म्हणाले की खासदार अशोक नेते यांनी आमच्या समाजाची जाहीर माफी मागावी असे सांगत जर त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार करुन त्याचा वर गुन्हा नोंदवण्याची मागणी माना समाजा कडून करण्यात येईल व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्याना त्यांची जागा दाखवू आणि जिथे जिथे माना समाज आहे त्या त्या ठिकाणी त्यांना प्रचार करू देणार नाही चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रात माना समाजाची संख्या मोठी असून येणाऱ्या निवडणूकित अशोक नेते यांना माना समाज धडा शिकवल्या शिवाय राहणार नसल्याचा गंभीर इशारा दिला.यावेळी विद्यार्थी आदिवासी संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते दरम्यान हुतात्मा स्मारक चिमूर येथून निषेध मोर्चा व घोषणा देत उपविभागीय कार्यलयावर येऊन निवेदन देण्यात आले.



















