सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.३/२/१९
पाटण,स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य पाटण तालुका व शहर कार्यकारणी निवड नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकारी तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असतानाच नाभिक बांधवांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पाटण तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार व मेळावा आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी राज्य अध्यक्ष मा.श्री. शंकररावजी गायकवाड साहेब होते. जिल्हा अध्यक्ष मा.अधिकराव चव्हाण, राज्य सरचिटणीस मा.मंगेश काशिद, राज्य उपाध्यक्ष मा.अरुण दादा सुरमुख यांच्या उपस्थितीत निवडी चा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी तालुका अध्यक्ष विष्णु सपकाळ पाटण मतदार संघात अध्यक्ष सतीश पवार, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी बाबुराव पवार, पाटण शहर अध्यक्ष जगन्नाथ पवार, पश्चिम महाराष्ट्र संघटक सुनिल चव्हाण, पाटण तालुका सचिव वैभव पवार, पाटण तालुका कार्याध्यक्ष पांडुरंग कानडे, पाटण संपर्क प्रमुख श्रीरंग गायकवाड पाटण, तालुका संघटक आनिल कदम, पाटण तालुका प्रसिध्दी प्रमुख कमलाकर भांदिर्गे, पाटण तालुका उपाध्यक्ष दादासाहेब पवार(पाटण) संदिप चव्हाण(कोयना) रामभाऊ जाधव(मल्हारपेठ) विक्रम महिपाल(चाफळ) नवनाथ माने (तारळे) तानाजी झेंडे(मोरगीरी) संजय चव्हाण(तळमावले) शहर सचिव संदिप पवार, शहर कार्याध्यक्ष नितीन पवार, शहर उपाध्यक्ष संतोष यादव, संघटक बापुराव चव्हाण, शहर प्रसिध्दी प्रमुख आनंद पवार, शहर संपर्क प्रमुख अमोल कदम यांच्या निवडी करण्यात आल्या.यावेळी निर्भिड पत्रकार तालुका प्रतिनिधी अनिल माने उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ पवार यांनी मानले.
पाटण येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यध्यक्ष मा.शंकररावजी गायकवाड साहेब म्हणाले गेल्या बारा वर्षापूर्वीचा समाज आणी २०१९ चा समाज हा जो परिवर्तन झालेला आहे नुसता परिवर्तन झालेला नाही तर स्वाभिमानी नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या संघटनेत काम करत असताना रक्ताच पाणी केलेल आहे.जे माज्या पाठीमागे सैनिक आहे त्या सैनिकांनमुळेच खऱ्या अर्थाने नाभिक समाजाचा गड उभा राहीला आहे शंकरावर गायकवाड हे फक्त निमित्त आहे.महाराष्ट्रामधे येणाऱ्या अडीअडचणींना किंवा कोणत्याही प्रवृत्तीला ठेचून काढण्याच काम गेली बारा वर्ष करत आलेलो आहे म्हणून आज नाभिक समाज सुरक्षित आहे.पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडीतील माज्या बहीणीवरती एका नराधमाने तिची कृरपणे हत्या केली,या हत्येच्या निषेर्धात कराड येथील दवाखान्यामधे ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने दिलेला शब्द आजपर्यंत चांगल्या पद्धतीने पाळला आहे व ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. परंतु ज्यावेळी संबंधीत पोलीस प्रशासन दिरंगाई करेल त्यावेळी हे प्रकरण सी.बी.आय. कडे सोपवण्यात यावे असेही ते म्हणाले. सातारा जिल्हा युवा विध्यार्थी सामजिक संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष मा.शुभमजी उबाळे साहेब हे यावेळी बोलले डोंगराच्या खुशीत बसलेल्या पाटण तालुक्यामध्ये असले प्रकार कधीही घडले नव्हते परंतु असले प्रकार पाटण तालुक्यात वारंवार घडत आहेत अशा प्रकारांना वेळीच आळा बसवण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येण गरजेचे आहे. सोनाली माने हिला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र शासनाचा नियम तोडून छत्रपती शासन चालवावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्या काळामधे जी शिक्षा देण्यात येत होती ती शिक्षा कुटतरी व्हावी अस वाटत.ते पुढेे म्हणाले महाराष्ट्र राज्य नाभिक समाजाला आमचा पाठींबा राहील.



















