सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.७/२/१९
पाटण, तालुक्यातील चिटेघर या गावामधे जो बंधारा बांधला गेलेला आहे त्या बंधाऱ्याला गेली सतरा ते अठरा वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत .परंतु संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी आश्वासनं दिली मोठी आणि कामं केली खोटी असा आरोप तेथील शेतकऱ्यांनी केला आहे. चिटेघर बंधाऱ्यामध्ये साखरी चिटेघर या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते ती मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. बंधाऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. शासनाने कोणतीच मदत न केल्याने शेतकरी अल्पभूधारक व भूमिहीन झालेला आहे. त्या गावातील शेतकऱ्यांना दुसरीकडे जाऊन रोजंदारी करण्याची वेळ आलेली आहे. गेले सतरा ते अठरा वर्ष झाली या गावातील शेतकऱ्यांनी अनेक मोर्चे आंदोलने आणी उपोषणे केली परंतु त्यांच्या पदरी मात्र आश्वासने पडली. तेथील शेतकऱ्यांना प्रकल्प विभागाकडून जो लाभ मिळाला जातो तो आज अखेर मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी योग्य त्या कागद पत्राची पूर्तता करून सुद्धा प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आज तेथील शेतकरी पूर्णपणे संतापलेला आहे.त्या गावातील शेतकऱ्यांनी चिटेघर, साखरी या गावातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने चिटेघर बंधाऱ्याजवळ ठिय्या मांडला. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले या आंदोलनामध्ये संबंधीत विभागाचे मुख्यकार्यकारी अभियंता सुरेन हिरे आणि त्यांचे सहकारी अधिकारी उपस्थित होते. तेथील संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला असता शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास ते असक्षम ठरले. त्याचबरोबर संबधीत प्रकल्पाचा प्रस्ताव का पाठवला नाही असे शेतकऱ्यांनी विचारले असता तो कुठेतरी गहाळ झाले असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर उपस्थित असणारे मीडियाचे पत्रकार बाबासाहेब सुतार व निर्भिड पत्रकारचे प्रतिनिधी अनिल माने यांना त्यांनी मुलाखत देण्यास साफ नकार दिला. शेतकऱ्यांना कोणताही सक्षम निर्णय किंवा पर्याय न देता त्यांनी तेथून पळ काढला.



















