सातारा (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,गोविंद मोरे
दि.०६.०४.१९
फलटण,येथील सोमवार पेठ मधील सर्वे.नं ६ या जागेवर गेल्या पन्नास वर्षा पासुन अनुसुचित जाती जमाती व भटके विमुक्त लोक राहत आहेत या जागेचा नगर पालीका कर पाणी, पट्टी विजबिल हे लोक गेल्या पन्नास वर्षापासुन भरत आहेत मोकळ्या ठिकाणाच्या जागेवर जर अतिक्रमण असेल तर ती जागा नगरपालीकेच्या आधीग्रहीत करता येत नाही.असे असताना ही फलटण मधील काही स्वार्थी सत्ताधारी राजकीय पुढारी व त्यांनी सभांळलेले राजकीय पुढारी गुंड लोक व त्याच्या सोबत असलेले लालची कर्मचारी यांनी मिळून फलटण मधील गरीब जनतेवर अन्याय करण्याचे ठरवीले आहे असे पाहवयास मिळत आहे. सोमवार पेठ येथील लोंकाना निघुन जा नाही तर जिवंत मारून टाकू अशा धमक्या ही दिलेल्या आहेत नगरपालिका हद्दीत राहत असलेल्या सर्व सामान्य जनतेला तेथील स्थानिक पुढाऱ्याच्या सांगण्यावरुन नगर पालिका प्रशासनाचा धाक दाखवून त्यांना विनाकारन त्यांच्या राहत्या घरातून त्यांच्याकडे ठोस पुरावे असून देखील त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडत आहे.त्याच जागेवर त्यांना राहता यावे म्हणून त्यांच्या पुराव्या आधाराद्वारे बहुजन समाज पार्टी आणखी तेवढ़याच उमेदीने आणि जनतेच्या जोरावर जनसामान्य लोकांना न्याय हक्कासाठी पुन्हा मैदानात उतरली आहे.
फलटण प्रांतधिकारी,तहसिलदार साहेब फलटण नगरपरिषद सि.ओ.साहेब यांना निवेदन दिले असुन प्रस्थापित राजकिय दबाव धमकी येत असल्यामुळे पुढिल कार्यवाहीसाठी निवासी जिल्हा अधिकारी थोरवे साहेब व साताराचे एस पी सातपुते मॅडम यांना ही निवेदन देण्यात आले.
बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव मा.काळुराम चॊधरी यांच्या मार्गदर्शना खाली बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य कार्य.सदस्य मा.प्रा.दादासाहेब गायकवाड सर तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष व सातारा लोकसभेचे उमेदवार मा.आनंदजी थोरवडे साहेब यांच्या नेतृत्वखाली सातारा जिल्हा पदाधीकारी मा.संदीप पवार,मा.मल्लेश जानकर,गायकवाड साहेब मा.हनुमंत पवार मा.महेश सराटे,सातारा जिल्हा महासचिव
मा.मंगेश मोरे,मा.प्रेम मोरे,मा.प्रविण विटकर,फलटण बि.व्ही.एफ.दिनेश कांबळे व संदिप सोणावने,फलटण मा.गॊतम भोसले,संदेश वाघमारे,उदय काकडे, मंगेश आवळे व फलटण चे सर्वच पदाधिकारी व कार्येकर्ते यांच्या समवेत पाटणचे जेष्ठ नेते मा.शिवाजी कांबळे कराड द.कराड उ.चे नेते विधान सभा अध्यक्ष मा.संतोष थोरात,मा.सिध्देश्वर गायकवाड व पवार वकीलसाहेब.बामसेफ मा.राजेशजी पवार,फलटण शहरातील नवयुवा नेतुत्व मा.नवादादा पवार,रामा पवार,रोहन जाधव,दिनेश पवार असा असंख्य मिञ परिवार व सोमवार पेठेतील पिडित जनसमुदाय उपस्थित होता.याचा निर्णय लवकरात लवकर नाही लागला तर बहुजन समाज पार्टी सातारा जिल्हात व महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही सातारा जिल्हा अध्यक्ष मा.आनंदजी थोरवडे यांनी दिला आहे.



















