चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०८.०५.१९
चिमूर, तालुक्यातील भानसुली येथील रहिवासी विठ्ठल किचू रणदिवे हे आपल्या पत्नीसह तेंदूपत्ता तोडण्याकरिता जंगलात गेले असता सकाळी ८ वाजता दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक पणे हल्ला चढविला. अचानक केलेल्या हल्लात विठ्ठल यांनी हल्लाचा वेळस प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता ते पूर्णता गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी नागपूर येथे भरती करण्यात आले आहे प्रथम त्याच प्रमाणे बाजीराव रणदिवे यांच्यावर सुद्धा हल्ला केला त्यांचा सोबत कुत्रा असल्यामुळे त्यांचा हाताला जबर मार लागला आहे ते थोडक्यात बचावले असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळा वर भेट देवुन पुढील कार्यवाही चालू आहे.



















