चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,प्रतीक नळे
दि.३१.०५.१९
बल्लारपुर- महाराष्ट्र शासन व अनुलोम(अनुगामी व लोकराज्य महाभियंन)यांच्या वतीने गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा(दि.३०)ला पळसगाव येथे शुभारंभ झाला.या प्रसंगी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ पळसगाव ता.बल्लारपूर शुभारंभ मा.मंडळ अधिकारी श्री.मोकाडे यांच्या हस्ते झाला. यावेळी पळसगावचे सरपंच श्री शंकर खोब्रागडे, तलाठी श्री रोहित चव्हाण,श्री तेजिन्दर सिंग दारी,ग्रामस्थ, शेतकरी,अनुलोम संस्थेचे हृषीकेश देशपांडे,सुनिल दालवनकर उपस्थित होते.तलावातील गाळ शेती करिता उपयुक्त असून बहुसंख्येने शेतकरी हा गाळ आप आपल्या शेतात मध्ये टाकण्यासाठी घेऊन जात आहेत.पळसगांव गावाजवळ शेतकरी वर्गाला तलावातील गाळ हवा असल्यास कामाच्या ठिकाणी संपर्क साधून आपल्या शेतजमीन सुपीक करावी असे आव्हान करण्यात आले आहे.



















