पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०६.१९
पिंपरी- देशभरात चाललेल्या माॅबलिंचींगच्या विरोधात मुस्लिम जमात पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे या अमानुष घटने जाहीर निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले.सध्या देशभरात अल्पसंख्याक (मुस्लिम समाजावर) माॅबलिंचींग-झुंडशाही पध्दतीने अत्याचार करून जीवे ठार मारण्याचे षडयंत्र जोरात चाललेलं आहे. त्या विरोधात आज रोजी शहरातील बहुसंख्याक लोकांनी रस्त्यावर येवून आंदोलन केले व सदरच्या होणार्या अत्याचारा विरोधात अत्यंत कडक कायदा यावे, असा ठराव मंजूर करण्यात आला, सदर आंदोलनामध्ये विविध समाज संघटनांनी सहभाग घेवून आपला जाहीर पांठिबा व्यक्त केला. सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुस्लिम जमात पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने मौलाना फैजअहमद फैजी,मौलाना आलीम, मौलाना इनायत करीम,हाजी नसीबुल्लाहा, मौलाना तनवीर आलम, मौलाना नसीम मुल्ला मौलाना हाबिब रजा,मौलाना मुराद आली, मौलाना फिरोज आली, मौलाना हामिद रजा, मौलाना गफ्फार, मौलाना नय्यब नूरी, मौलाना कारी इकबाल,मुफ्ती गफ्फार रजा,जावेद शेख, सामाज सेवक मानव कांबळे,सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर , अल्ताफ शेख, युसूफ कुरेशी, कलिंदर (मामु)शेख,अजहर खान,शाहाबुद्दीन शेख,रफिक कुरेशी, इम्रान बेग, जिल्लानी सय्यद, इम्रान बिजापुरे, अकिल मुजावर, आसिफ सय्यद, धम्मराज साळवी, व्ही. एम. कबिर, सलिम सय्यद, महेबूब शेख, अजूम इनामदार,इस्माईल संगम, सिद्दिक शेख, दावल नदाफ, सद्दाम, मेहबूब शेख, नियाज अहमद शेख, गिरीश वाघमारे, राहुल हमीद शेख, आसिफ सय्यद, कासिम सय्यद, गुलाम शहा, खाजा शेख, निय्याज देसाई, बाळासाहेब रोकडे,इद्रीस मेमन,श्रीधर काळे, शकील खान, एजाज खान आदि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



















