बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,महादेव काळे
दि.१७.०७.१९
आष्टी- गेल्या वर्षापासून दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, भूमिहीन लोकांच्या प्रश्न घेऊन अनेक वेळा आंदोलन उपोषण करून देखील गेंड्याची कातडी पांघरून बसलेले महसुल प्रशासनाने अद्यापही गायरान जमीन करणाऱ्या लाभ धारकांच्या एकिला नोंद घेतल्या नाहीत कि धान पेर देखील लावली नाही. त्यामुळे प्रशासनाने आठ दिवसांत गायरान जमीनीची एकिला नोंद घ्यावी नसता दंडुके मोर्चा काढणार असल्याचे प्रतिपादन आयोजित बैठकीत सोशल फोरमचे जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी केले. आष्टी तालुक्यातील आदिवासी, दलित, भटके, विमुक्त, भूमिहीन लोकांनी गायरान जमीनी कसत आहेत. पण एवढे वर्ष जमीनी कसून देखील एकिला नोंद घेतली गेली नाही कि धान पेर लावले नाही. त्यामुळे आता सर्व लोकांना सोबत घेऊन आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली गायरान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ही कैफियत महसूल प्रशासनाच्या लक्षात आनण्यासाठी येत्या आठ दिवसांत तहसील कार्यालयावर दंडुके मोर्चा काढण्यात येणार असून हा लढा आपल्याला आपला हक्क मिळे पर्यंत चालुच ठेवायचा आहे असेही खंडागळे म्हणाले. त्यामुळे एकमेकांनी मतभेद विसरून एकत्र यावे असे आवाहन देखील यशवंत खंडागळे यांनी केले आहे.बैठकीचे संचलन संदिप कारजकर तर आभार संदिप जावळे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष उपस्थित होते.



















