चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०७.१९
बल्लारपूर- बल्लारपूर ते आष्टी महामार्गावरील दहेली गावाजवळील पुल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाला आहे.
बल्लारपूर आष्टी महामार्गावर बामणी ते आष्टी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग रस्ते बांधकाम सुरू असून बामणी पासून ३ किलोमीटर वर असलेल्या दहेली गावालगत निर्माणाधिन पुलाजवळच वाहतूक सुरळीत करण्याकरिता पर्यायी उपरस्ता निर्माण करण्यात आला होता.
परिसरात कालपासून अतिवृष्टी सुरू असून अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने हा पर्यायी कच्चा उपरस्ताच सकाळी ६ च्या दरम्यान वाहून गेला असून दोन्ही बाजूच्या वाहतुकीची कोंडी झाली आहे व अनेक गाड्या पावसात लटकून पडल्या असून प्रशासनाकडून कोणतेही मदत कार्य अजून सुरू झाले नाही.



















