बारामती(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२२.०९.१९
◆ तरुणांची शक्तीच देशावर आलेलं भाजपकृत संकट परतवून लावणार- शरद पवार
बारामती- छात्रभारती विध्यार्थी संघटना, लोकभारती पक्ष,राष्ट्र सेवा दल व इतर समविचारी पक्षसंघटनेत राज्यभरात काम करत असलेले कार्यकर्त्यांनी लोकभारती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड अजिनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुशजी काकडे यांच्या मार्गदर्शखाली व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत गोविंदबाग बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी पवार साहेब म्हणाले की,आज भाजपकृत देशावर आलेल्या संकटातुन देशाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला तरुणामधून फार मोठी साथ आहे,वाढता पाठिंबा महत्वपुर्ण आहे.यावेळी बोलताना अँड.अजिनाथ शिंदे म्हणाले देशात भाजप व सेनेचे प्रतिगामी लोकांचे सरकार आहे.शेती, शेतकरी व उद्योग क्षेत्र रसातळाला गेले आहे.जातीयवादी प्रवृत्तीने थैमान घातले आहे.हे थैमान फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्र पवार साहेबच रोखू शकतात म्हणून आज त्यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे.यावेळी पार्थ पोळके,रामदास निकम (सातारा),देविदास हटकर (धुळे) राजेश चव्हाण(पुणे),प्रभाकर शिंदे,अँड.प्रतापसिंह शेळके (पंढरपूर) यासह राज्यातील १० जिल्ह्यातील प्रमुख ५६ कार्यकर्ते तसेच करमाळा तालुक्यामधून पंचायत समितीचे माजी सभापती भरातभाऊ शिंदे,राजाभाऊ बेरे, मिसाळ मेजर,बाबुराव नेटके,शिवाजी दळवी,शिवाजी क्षीरसागर,रघुवीर जाधव यांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी करमावळा राष्ट्रवादी सोशल मीडिया उपाध्यक्ष नितीनभाऊ झिंजाडे, जिल्हा सरचिटणीस महेश काळे,युवक नेते चंद्रकांत जगदाळे सचिन नलवडे उपस्थित होते.



















