सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२२.०९.१९
फलटण- सातारा मुख्यालय आणि जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात दि.२ ऑक्टोबर रोजी विशेष राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अरुण खोत यांनी दिली.या लोकअदालतीमधे न्यायप्रविष्ठ प्रकरणे ४७०० चर्चेसाठी ठेवली आहेत. लोकअदालतीत धनादेश न वटलेल्या प्रकरणांचा समावेश आहे.जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होण्यासाठी सर्व आरोपींसाठी लोक अदालतीपूर्वी फिर्यादी,आरोपी किंवा दोघांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयात दुपारी ३ ते ६ या वेळेत उपस्थित राहुन त्यांना आपल्या चेकच्या केसबाबत तडजोडीची प्राथमिक चर्चा करता येईल.सदर दिवशी कोणत्याही प्रकरचे पैसे भरावयाचे नाहीत. परंतु आपल्याला तडजोड करायची असल्यास २ ऑक्टोबर रोजी शक्य तेवढी रक्कम भरुन उर्वरीत चेकच्या रकमेसाठी हप्ते ठरवून घेता येतील व तसा निवाडा आपणास दिला जाईल. चर्चेमध्ये न्यायाधीश महोदय व विधिज्ञ मार्गदशर्नन करतील.तरी सर्व आरोपी पक्षकारांनी जास्तीत जास्त संख्येने लोकअदालती करीता न्यायालयात सकाळी १०.१५ वाजता उपस्थित राहावे, व तडजोडीची संधी सोडू नये असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.प्रविण अ.कुंभोजकर आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अरुण खोत यांनी केले आहे.लोकन्यायालयामध्ये खटल्यामध्ये साक्षी-पुरावा,उलटतपासणी,दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात,निकाल झटपट लागतो. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुध्द अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. लोकन्यायालयाचा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार होते त्यामुळे निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो.परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकात द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही.कोर्टाच्या हुकूमनाम्या प्रमाणे लोकन्यायालयात होणारे निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते.वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होते व लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्यां प्रकरणामध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.



















