सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार,
दि.२५.०९.१९
करमाळा- सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या तपास संस्थांनी राज्यात नंगानाच चलावला असून आपल्या राजकीय विरोधकांच्या चौकशीचे बेकायदेशीर रित्या सत्र चालू आहे.भ्रष्टाचाराबाबत आपल्या सरकारची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे.विरोधी बाकावर असताना ज्या लोकांवर आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले,पुरावे दिले तेच लोक पुन्हा आपल्या आपल्या पक्षात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई किंवा चौकशी केल्याचे आढळत नाही.हा सरकारी यंत्रणेचा सरळसरळ गैरवापर आहे.अलीकडेच ईडी ने राज्य सहकारी बँकेच्या कथित अनियमितता प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले आहेत.यामध्ये भाजपसह सर्वच पक्षातील लोक आहेत.असे असताना सुद्धा आपण अजितदादा पवार यांचे नाव जास्त पुढं आणले जसे काही सगळ्या प्रकाराला तेच जबाबदार आहेत.सिंचन घोटाळ्याचे शेवटी काय झाले हे राज्याने शेवटी पाहिले आहेच.काल तर साऱ्या मर्यादा ओलांडत ईडीने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यांचे नाव सुद्धा सदर प्रकरणामध्ये गोवले आहे.हे लांच्छनास्पद आहे.पवार साहेबांच्या ५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी देशासह महाराष्ट्र उभा केला आहे.आजवर त्यांच्या नावावर एकही गुन्हा किंवा भ्रष्टचारचा आरोप नाही.असे असताना राज्य बँकेच्या प्रकरणात त्यांचे नाव गोवणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.पवार साहेब व अजितदादा यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई होणार असेल तर महाराष्ट्रातील लोक गप्प बसणार नाहीत.सध्या राज्यातील शेतकरी,महिला,तरुण,उद्योजक व समाजातील सर्व घटक हे राष्ट्रवादी सोबत आहेत हे पवार साहेबांच्या सध्याच्या महाराष्ट्रातील दौऱ्यातून समोर आले आहे.सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याने राजकीय आकसातून पावर साहेबांचे नाव काहीही संबध नसताना यामध्ये जोडले आहे.पवार साहेबांचे नाव विनाकारण कथित राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारात गोवण्यात आल्याच्या निषेधार्थ (दि.२६सप्टें.) गुरुवार रोजी करमाळा बंद ठेवण्यात येणार आहे.तरी आपल्या सरकारद्वारे होणारा तपास संस्थांचा दुरुपयोग थांबवण्यात यावा.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही.यातून समाजात अस्थिरता,सामाजीक शांततेला बाधा पोचल्यास यास सर्वस्वी आपले सरकार व त्याचे प्रमुख म्हणून आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असा इशारा सदर निवेदनात दिला आहे.या निवेदनावर राष्ट्रवादी सोशल मीडिया व नवा संघर्ष ग्रुप महाराष्ट्र चे जिल्हाध्यक्ष
नितीन झिंजाडे,राष्ट्रवादी चे तालुका उपाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील राष्ट्रवादी पक्षात नव्याने प्रवेश केलेले अँड.अजिनाथ शिंदे,अँड.सविता शिंदे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत,सचिन नलवडे,चंद्रकांत जगदाळे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष महेश काळे,मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे,अरुण जगताप, राजेंद्र कांबळे,नाना गोडसे,तेजस ढेरे,प्रथमेश बिनवडे,प्रेमकुमार सरतापे,अजय साबळे,संतोष जगदाळे,अमोल आढळे आदी कार्यकर्त्यांच्या साह्य आहेत.



















