सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२८.०९.१९
फलटण- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवार दि.२७ सप्टेंबर रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामाविधान सभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या कडे दिला आहे.बागडे यांनी तो मंजूर केला आहे.कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.राजीनामा दिल्या नंतर अजित पवार नॉट रीचेबल होते.
अजित पवार साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उदयनराजें विरोधात सक्षम उमेदवार मिळत नसल्याने राष्ट्रवादीने अजित पवारांनाच त्यांच्या विरोधात उतरण्याची खेळी चालवली असल्याचं कळते आहे.यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.तर त्यामुळे पार्थ पवार यांना बारामती विधानसभेची जागा मोकळी होणार आहे.असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.



















