चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे दि.१.१०.१९
चिमूर- तालुक्यातील मौजा पळसगावं येथील गरीब आदिवासी कुटुंबातील श्री.नामदेव जानबा कोहळे हे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते त्याचे रात्रीला ११ वाजताच्या दरम्यान मयत झाले असून सदर कुटुंब गरीब असल्याने त्यांचा कुटुंबाना मयत व्यतिच्या अंत्यविधी करिता गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी लोकवर्गणी करून त्यांना कुटुंबास सहकार्य करण्यात आले या वेळेस राजू आत्राम,विनायक ठाकरे,हाफिज शेख,ज्ञानेश्वर गुरनुले,रोशन बन्सोड,प्रजवल लोणारकर,प्रभाकर वातगूरे,प्रकाश राऊत,वासुदेव कोहळे व त्याचा कुटुंबातील व्यक्ती उपस्थिती होते.



















