सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३.१०.१९
फलटण- तालुक्यामध्ये ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी ओसरते ना ओसरते तोच वाळू माफियांकडून वाळू उपसा सुरू झाला आहे.त्यामुळे अनधिकृत कामांना उत आला आहे त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.यासाठी ग्रामपंचायत व प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत अन्यथा प्रशासना विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला.अनेक वर्ष सासकल गावच्या या ओढ्यावर अनधिकृत वाळूचा उपसा सुरू आहे मात्र तेथील अधिकाऱ्यांची आर्थिक हितसंबंध असल्यामुळे वाळू उपसा सुरूच असल्याचे बोलले जात आहे.सततच्या वाळू उपशामुळे ओढ्याचे पात्र बदलले आहे.त्यामुळे ओढ्याच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. काही वाळूमाफिया हे रात्री बेरात्री सुद्धा आवारात वाळू उपसा करत आहेत.वाळू उपसा सुरू असताना रात्रभर गावाला दहशतीखाली राहावे लागत आहे.याठिकाणी प्रशासनाचा कोणताच धाक नसून याबाबत एखाद्याने तक्रार दिल्यास त्याची माहिती वाळू माफियां पर्यंत पोहचवली जाते आहे.यानंतर वाळू माफिया शेतकऱ्यांना धमकावत आहेत . मागासवर्गीय निधीतून दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलेला पूल निकृष्ट बांधकाम चुकीच्या भौगोलिक रचना व अनधिकृत वाळू उपशामुळे पहिल्याच पावसात वाहून गेला.नकाशा मध्ये ज्या ठिकाणी रस्ता नाही.अशा ठिकाणी पूल बांधल्याने ओढ्याच्या पुरामुळे जमिनी वाहून गेल्या आहेत गेली.पूल परिसरात दिवसाढवळ्या राजरोसपणे वाळू उपसा सुरू असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालय संपर्क केला परंतु लगेच पथक पाठवतो असे सांगून हे याठिकाणी कोणीही प्रशासकीय अधिकारी फिरकले नाहीत.यामुळे कुंपणच शेत खात आहे?असा सवाल उपस्थित राहत आहे कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यासाठी तलाठी पीक पाणी करण्यात व्यस्त तर इतर प्रशासकीय अधिकारी लोक निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगितले जात आहे.त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.? तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सासकल ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.



















