नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.१२.१०.१९
◆ प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचे भुजबळांना बळ.
येवला- मतदारसंघात कोणी काय काम केलं आणि कोणी काय नाही केलं हे जनतेला ठाऊक आहे. मात्र काहींना विकास दिसत नाही कारण ज्यांनी दहा वर्षे मतदारसंघात नेतृत्व करून त्यांना मतदारसंघाचा तर नाहीच स्वतः देखील विकास करता आले नाही त्यातही ते अपयशी ठरले अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. नगरसुल येथे आयोजित प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते. नगरसुल येथील नेते प्रमोद पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भुजबळांचे बळ अधिक वाढले आहे.
यावेळी अंबादास बनकर, प्रमोद पाटील, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, संजय सोमसे, संतू पाटील झांबरे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले,बाळासाहेब गुंड, अरुण थोरात, नवनाथ काळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, एकनाथ गायकवाड, सरपंच प्रसाद पाटील,अरुण आहेर, रामदास काळे, मोहन शिरसाठ, सुनील पैठणकर, गणेश दारुंटे, महेश दारुंटे आदी उपस्थित होते.



















