नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.१५.१०.१९
येवला- कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. बाच्छाव यांना ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. हिंदी विभागातील प्राध्यापक कैलास बाच्छाव यांनी आपले मौलिक विचार वाचन दिवसाचे महत्व या वर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी वाचनातून आपल्या जीवनाचे प्रतिबिंब कसे उमटत असते आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे वाचनामुळे आपल्या मनातील दुर्वीचार दूर होतात. व सुविचारांचे घर मनात बसते. वाचनामुळे मनःशांती आनंद उत्साह व आरोग्य प्राप्त होते. वाचनातून एक चिंतन निर्माण होते या चिंतनातून बुद्धीचा विकास होतो. व आपल्या प्रगतीचे प्रमुख साधन बनते. वाचनाने उच्च विचार निर्माण होतात. समाजात वाचन नसलेल्या व्यक्तीला अविचारी व अज्ञानी समजले जाते. मग या अज्ञानातून अहंकार अविवेकी असमाधान अश्या अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी स्वतःहून निर्माण केली पाहिजे त्याच्याने विद्यार्थ्यांमध्ये सृजनशिलता निर्माण होते. त्यांची कल्पना शक्ती विकसित होते. विविध विषयांच्या पुस्तकांचे वाचन केल्याने आपले संयम स्मरण शक्ती चा विकास होतो. आपल्या भाषेवर आपले प्रभुत्व निर्माण होते. असे विचार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कलाम यांचा जीवन परिचय देताना ते वैज्ञानिक बौद्धिक दृष्टीने जेवढे मोठे होते त्याही पेक्षा ते माणूस म्हणून फार मोठे होते असे स्पष्ट केले. सरांनी सांगितले की त्यांच्या मूळ.गावी मी प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा त्यांचे छोटेसे घर व त्यांचा संघर्षाचा प्रवास एकूण मी चकित झालो. लहान पाणी वृत्तपत्र टाकणारे मनात देशासाठी काहीतरी करण्याची प्रचंड जिद्द असणारे असे हे व्यक्ती महत्व प्रेरणा देणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे अग्निपंख हे पुस्तक वाचलेच पाहिजे. त्याच्यात डॉ. कलमांचा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला एक नवीन ऊर्जा देतो. विद्यार्थ्यांनी या दिवसाचे महत्त्व ओळखून जास्तीत जास्त संख्येने ग्रंथालयातील पुस्तक शब्दकोश साहित्य कोश याचा अभ्यास केला पाहिजे. महाविद्यालयातील या सर्व ग्रंथांचा उपयोग आपण आपल्या ज्ञानवृद्धी साठी आपण करावा असे आव्हान त्यांनी केले. सरांनी आपल्या वाचना विषयी मत व्यक्त करताना रोज कमीत कमी दोन पाने तरी विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजे शेवटी वाचानानेच समृद्ध होत असतो. ययाति, छाव, अश्या अनेक साहित्य रचनांचे महत्व सरांनी विशद केले. आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर आपले वाचन हे व्यापक असले पाहिजे शेवटी कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. तसेच वाचानाशिवाय आपली बौध्दीक प्रगती होणार नाही. सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरणे देताना सांगितले की डॉ. बाबासाहेबना वाचनाची आवड होती. त्यांच्याकडे विविध विषयाची पुस्तके होती. या पुस्तकांनी बाबासाहेबाना एक न्यांवंत विचारवंत व्यक्ती म्हणून घडविले विद्यार्थ्यांनी अश्या मोठ्या व्यक्तींचा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे. व वाचनाकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे या विषयी त्यांनी आपले महत्त्व पूर्ण विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रोहिणी कावत या विद्यार्थिनीने केले. आदिती घोष या विद्यार्थिनिने आपले विचार व्यक्त केले. चि. कुणाल निकम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमास डॉ. गजानन भामरे, डॉ. जी.डी.खरात, सर्व प्राध्यापक व शिक्षेकेतर कर्मचारी ची.महेश दारूंटे, नितीन शिंदे, जनार्दन धनगे. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.येवला- कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. बाच्छाव यांना ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. हिंदी विभागातील प्राध्यापक कैलास बाच्छाव यांनी आपले मौलिक विचार वाचन दिवसाचे महत्व या वर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी वाचनातून आपल्या जीवनाचे प्रतिबिंब कसे उमटत असते आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे वाचनामुळे आपल्या मनातील दुर्वीचार दूर होतात. व सुविचारांचे घर मनात बसते. वाचनामुळे मनःशांती आनंद उत्साह व आरोग्य प्राप्त होते. वाचनातून एक चिंतन निर्माण होते या चिंतनातून बुद्धीचा विकास होतो. व आपल्या प्रगतीचे प्रमुख साधन बनते. वाचनाने उच्च विचार निर्माण होतात. समाजात वाचन नसलेल्या व्यक्तीला अविचारी व अज्ञानी समजले जाते. मग या अज्ञानातून अहंकार अविवेकी असमाधान अश्या अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी स्वतःहून निर्माण केली पाहिजे त्याच्याने विद्यार्थ्यांमध्ये सृजनशिलता निर्माण होते. त्यांची कल्पना शक्ती विकसित होते. विविध विषयांच्या पुस्तकांचे वाचन केल्याने आपले संयम स्मरण शक्ती चा विकास होतो. आपल्या भाषेवर आपले प्रभुत्व निर्माण होते. असे विचार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कलाम यांचा जीवन परिचय देताना ते वैज्ञानिक बौद्धिक दृष्टीने जेवढे मोठे होते त्याही पेक्षा ते माणूस म्हणून फार मोठे होते असे स्पष्ट केले. सरांनी सांगितले की त्यांच्या मूळ.गावी मी प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा त्यांचे छोटेसे घर व त्यांचा संघर्षाचा प्रवास एकूण मी चकित झालो. लहान पाणी वृत्तपत्र टाकणारे मनात देशासाठी काहीतरी करण्याची प्रचंड जिद्द असणारे असे हे व्यक्ती महत्व प्रेरणा देणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे अग्निपंख हे पुस्तक वाचलेच पाहिजे. त्याच्यात डॉ. कलमांचा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला एक नवीन ऊर्जा देतो. विद्यार्थ्यांनी या दिवसाचे महत्त्व ओळखून जास्तीत जास्त संख्येने ग्रंथालयातील पुस्तक शब्दकोश साहित्य कोश याचा अभ्यास केला पाहिजे. महाविद्यालयातील या सर्व ग्रंथांचा उपयोग आपण आपल्या ज्ञानवृद्धी साठी आपण करावा असे आव्हान त्यांनी केले. सरांनी आपल्या वाचना विषयी मत व्यक्त करताना रोज कमीत कमी दोन पाने तरी विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजे शेवटी वाचानानेच समृद्ध होत असतो. ययाति, छाव, अश्या अनेक साहित्य रचनांचे महत्व सरांनी विशद केले. आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर आपले वाचन हे व्यापक असले पाहिजे शेवटी कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. तसेच वाचानाशिवाय आपली बौध्दीक प्रगती होणार नाही. सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरणे देताना सांगितले की डॉ. बाबासाहेबना वाचनाची आवड होती. त्यांच्याकडे विविध विषयाची पुस्तके होती. या पुस्तकांनी बाबासाहेबाना एक न्यांवंत विचारवंत व्यक्ती म्हणून घडविले विद्यार्थ्यांनी अश्या मोठ्या व्यक्तींचा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे. व वाचनाकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे या विषयी त्यांनी आपले महत्त्व पूर्ण विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रोहिणी कावत या विद्यार्थिनीने केले. आदिती घोष या विद्यार्थिनिने आपले विचार व्यक्त केले. चि. कुणाल निकम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमास डॉ. गजानन भामरे, डॉ. जी.डी.खरात, सर्व प्राध्यापक व शिक्षेकेतर कर्मचारी ची.महेश दारूंटे, नितीन शिंदे, जनार्दन धनगे. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



















