सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,दिपक माने
दि.१५.१०.१९
सातारा- पाटण तालुक्याचे सुपुत्र (धाकट पाटील )मा.नरेंद्र पाटील यांच्या मीशीच्या तडाक्यातून बचावलेले उदयन भोसले आता पाटण तालुक्याचे सुपुत्र राजकारणातील ज्येष्ट बुजुर्ग (थोरल पाटील) मा.श्रीनिवास पाटील यांच्या मीशीच्या पीळातुन सुटतील का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून जस जसा मतदानाचा कालखंड जवळ येत आहे तस तसा काळजीने अनेक चाहत्यांचा जीव मात्र टांगणीला लागलेला दिसतो कारण सातारा जिल्ह्याचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास पाहता यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांच्या नेतृत्वात जडणघडण झालेला सातारा आपले पुरोगामीत्व सोडून एकाएकी हिंदुत्वाकडे वळेल का? की सध्याच्या राजकीय स्थीरतेचा आणी अस्थिरतेचा विचार करता आज देशाच्या आणी राज्याच्या राजकारणामधे शरद पवारांसारखा मुत्सद्दी, धूर्त व धुरंधर आणी प्रासंगिक निर्णय क्षमता व तेवढीच प्रभावशीलता असणारा राजकीय प्रतिभावंत सर्व सामन्यांचा असणारा सर्व सामान्य नेता दरेकाला आपलासा वाटणारा असा एकही नेता आजच्या राजकारणात तरी नाही आणी त्यांना सुद्धा नामशेष करण्याच्या इराद्याने हिंदुत्वाच्या आधारावर विरोधकांनी चालवलेल्या फोडा फोडीच्या राजकारणाने राजकीय तत्वनिष्ठा डावपेच इत्यादी बाबीला काही अर्थ राहिलेला नसून हिंदुत्ववादाकडे काही मंडळी देशाला घेवून चालली आहेत हीच खरी अतिशय भयानक आणी गंभीर स्वरूपाची बाब होय यातून जे चित्र उभे राहणार आहे ते जर उभे राहिले तर मानवता हा शब्द इतिहास जमा होवून धार्मिक अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.आणी हे सार थांबवायचे असेल तर मा.पवार साहेबांचा पक्ष सक्षम करून त्यांची राजकारणातील पकड मजबूत करणे गरजेचे आहे असे काहींचे मत असून काही मंडळी या मताच्या विरुद्ध सुद्धा आहेत त्यांच्या मते राज्यातील तरुणांना खऱ्या अर्थाने बेकार करण्यामधे पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
कारण खाजगीकरण हे पवार साहेबांच्याच राजवटीतील त्यांच्याच कर्तुत्वाचे फळ होय या शिवाय दारिद्र रेषा मुक्त भारत सरकारी नोकर भरती बंद झिरो बजेट यामुळे राज्यात बेकारीने थैमान घातले गरीबीचा स्थर उंचावला शेतकरी शेतमजूर आणी निव्वळ मजूर अक्षरशः बेरोजगार झाले त्यामुळे दारिद्र वाढले यावर उपाय म्हणून जनतेने सत्तांतर केले कारण जनतेला मोदीजींनी दिलेले आश्वासन म्हणजे देशातील भ्रष्टाचाऱ्यांकडील काळा पैसा बाहेर काढून प्रत्येकाच्या नावे बँक खात्यावर पंधरा लाख रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन खरे वाटले त्यामुळे जनतेला पर्याय दिसला आणी सत्तांतर केले.पण यांनी सुद्धा निराशाच केली.कारण ज्या कारणासाठी यांना निवडून दिले ते करायच सोडून विद्यमान सरकार सत्तेवर आल्या पासून नको त्या भानगडी करून जनतेला असहाय्य त्रास देवू लागले उदा.गरज नसणारी नोटा बंदी, आवश्यक नसणारी जी.एस.टी, अतिआवष्यक असणारी परंतू जनतेच्या लुबाडनुकीसाठी निर्माण केलेली उज्वला गँस, कारण नसताना हजारो कोटींचे पुतळे.अशा नको त्या भानगडी सरकार ने सुरू केल्या यांचाच खऱ्या अर्थाने सामान्य जनतेला भयानक त्रास झाला अनेक छोटे मोठे उद्योग कारखाने बंद पडले आणी अगोदरच्या सरकारने निर्माण केलेल्या गरिबी, बेकारी आणी दारिद्य्र नष्ट होण्या ऐवजी अनेक पटीने वाढले.आणी त्यामुळे परिस्थितीने खचलेला, हताश झालेला शेतकरी, शेतमजूर कर्जबाजारी झालेला असा दरेक नागरीक अक्षरशः स्वतःला या परिस्थिती समोर टिकवू शकला नाही आणी त्यामुळे आपल्या बायको व मुला बाळांना विष पाजून मारू लागला, फास लावून मारू लागला, वीहरीत ढकलून मारू लागला आणी स्वतः सुद्धा जिथे जागा मिळेल तिथे फासावर लटकु लागला तर काही जन या साऱ्यातून मुक्तता व्हावी म्हणून आपल्या बायका मुलांच आणी आई वडिलांच शेवटच दर्शन घेवून स्वतःच आत्महत्या करू लागला.आणी अशी परिस्थिती असताना सुध्दा सरकार मात्र हजारो करोडो रुपयांचे पुतळे उभारण्यात मश्गुल झाले आहेत उदा वल्लभभाईचा पुतळा या दैनिय परिस्थिती पेक्षा महत्वाचा आहे का? शिवरायांच्या आणी आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणत नेमक त्यांच्याच विचारांची पायमल्ली करायची का? जरी वल्लभभाई पटेलांचा पुतळा आपल्या राज्यात नसला तरी विद्यमान सरकारच्या कर्तुत्वाची एकमेव साक्ष आहे.कारण केंद्रात आणी बहुतांशी राज्यात जर विद्यमान सरकारची सत्ता असेल तर देशातील लोकसंख्येचा आकडा आणी आत्महत्या करत्या सामान्य, गरीब, शेतकरी, शेतमजूर आणी निव्वळ मजूर या सारख्या कर्जदारांचा कर्जाचा एकूण आकडा विचारात घेता १०० % कर्ज माफी करणं सरकारला जरी शक्य नसल तरी ९९ % कर्ज माफी करता आली असती पण देशाच दुर्दैव असं कीं शेती प्रधान म्हणवल्या जाणाऱ्या या देशामध्ये देश स्वतंत्र्य झाल्या पासून देशाच्या सर्वोच्च आणी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शासकीय, प्रशासकीय आणी राजकीय महत्वपूर्ण जागांवर एकही शेतकरी आज अखेर नाही त्यामुळेच कीं काय शेतकऱ्यांच्या मैताच सौयर सुतक कोणत्याच सरकारला अजीबात नाही त्यामुळे मतदान नक्की कोणाला करायच कारण सगळे एकाच माळेचे मनी असल्याचे सिद्ध झाले त्यामुळे दुष्काळामुळे जसा शेतकरी चिंतेत आहे तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच सरकार नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.या चिंतेतून मुक्तता म्हणून जनता तिसरा पर्याय निवडेल कीं यांच्या पेक्षा पहिलेच बरे म्हणून कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आणेल हे येणारा काळच ठरवील असे एकंदरीत राजकीय चित्र असले तरी पाटण तालुक्याच धाकट पाटील यांच्या मिशीच्या तडाक्यातून सुटललेले उदयन भोसले थोरल्या पाटलांच्या मीशीच्या तडाक्यातून सही सलामत सुटून जनतेला न्याय देतील कीं थोरल्या पाटलांच्या मीशीच्या पिळात अडकून पडतील हाच खरा जिल्ह्याच्या प्रतिष्ठेचा आणी चिंतेचा प्रश्न आहे.



















