नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.१७.१०.१९
येवला- काँग्रेस काँग्रेस आणि मित्रपक्ष आघडीचे अधिकृत उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज लासलगांव येथे सभा आयोजित करण्यात आली होती.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वक्ते अमोल मिटकरी यावेळेस उपस्थित होते छगन भुजबळ यांनी यावेळेस आपल्या भाषणात युती सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. कर्जमाफी देताना सरकारने जशी फरफट केली तशीच फरफट आता शेतकरी सरकारची करणार आहे असे ते म्हणाले. युती सरकारबद्दल असणारा शेतकरी आणि कामगार वर्गाचा रोष आता प्रचंड वाढला असुन या सरकारला सत्तेवरून पायउतार होण्यास थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत असे त्यांनी ठासून सांगितले. जनतेच्या पाठिंब्यावर आणि आशीर्वादाच्या जिवावर आपण विक्रमी मतांनी विजयी हिणार आहोत असा ठाम विश्वास त्यांनी यावेळेस बोलून दाखवला. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अमोल मिटकरी म्हणाले या युती सरकारने शरद पवारांना संपवण्याचा डाव रचला असून या सरकारचा हा डाव कधीही यशस्वी होणार नाही या राज्यातील जनता आमच्या बरोबर असल्याने २१ तारखेनंतर या राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री राष्ट्रावादीचाच राहणार आहे. शिवसेनेची सध्या मोठी फरफट चालू असून वाघाची शेळी झाल्याने त्यांना आता खाली वाकल्या शिवाय गत्यंतर नाही अशी खरमरीत टीका अमोल मिटकरी यांनी यावेळेस केली.येवला- काँग्रेस काँग्रेस आणि मित्रपक्ष आघडीचे अधिकृत उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज लासलगांव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वक्ते अमोल मिटकरी यावेळेस उपस्थित होते.
छगन भुजबळ यांनी यावेळेस आपल्या भाषणात युती सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. कर्जमाफी देताना सरकारने जशी फरफट केली तशीच फरफट आता शेतकरी सरकारची करणार आहे असे ते म्हणाले. युती सरकारबद्दल असणारा शेतकरी आणि कामगार वर्गाचा रोष आता प्रचंड वाढला असुन या सरकारला सत्तेवरून पायउतार होण्यास थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत असे त्यांनी ठासून सांगितले. जनतेच्या पाठिंब्यावर आणि आशीर्वादाच्या जिवावर आपण विक्रमी मतांनी विजयी हिणार आहोत असा ठाम विश्वास त्यांनी यावेळेस बोलून दाखवला.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अमोल मिटकरी म्हणाले या युती सरकारने शरद पवारांना संपवण्याचा डाव रचला असून या सरकारचा हा डाव कधीही यशस्वी होणार नाही या राज्यातील जनता आमच्या बरोबर असल्याने २१ तारखेनंतर या राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री राष्ट्रावादीचाच राहणार आहे. शिवसेनेची सध्या मोठी फरफट चालू असून वाघाची शेळी झाल्याने त्यांना आता खाली वाकल्या शिवाय गत्यंतर नाही अशी खरमरीत टीका अमोल मिटकरी यांनी यावेळेस केली.



















