नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.२२.१०.१९
येवला- सर्व श्रेष्ठ मानले जाणारे मतदान आणि हेच मतदान पूर्वी लोकशाही अस्तित्वात असून देखील हुकुमशाही पद्धतीने मतदान करून घेत असत. गावातील लोक अशिक्षित असल्याने साहजिकच हुकुमशाही चालत परंतु कालंतराने लोक ज्ञानी होऊ लागली आणि हुकूमशाहीला मोडखळीस आणले. आज मात्र कुठल्याही व्यक्तीवर दबाव टाकून मतदान करून घेण्याची सवय राहिलेली नाही. आज प्रत्येक घरातील एक व्यक्ती शिक्षित आहे, त्यामुळे सर्वांना आपले कर्तव्य आणि अधिकार समजते. पूर्वीच्या काळी गावात दोन गट पडले जात होते. दोन गट पडले म्हणजे गावात वाद वाढत चालायची. परंतु आज मात्र कुठल्याही प्रकारची गट बाजी दिसत नाही. प्रत्येक नागरिक आपले मतदान करण्यासाठी शांततेत येऊन मतदान करून जात. यामुळे गावातील संबंध देखिल घट्ट झाले. मतदार देखील स्वयंशिस्तीचे पालन करू लागला. आज गावात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सुद्धा आज तरूनांपेक्षा वृद्ध व मध्यमवयातील लोक मोठ्याप्रमाावर मतदान केंद्रात बघायला मिळाली. या विधान सभांला नांदूरमधे ८५ टक्के मतदान झाले. या वेळी नांदुरचे पोलीस पाटील श्री. राजेंद्र बर्डे, व सकाळ यिन सदस्य श्री. गणेश दारुंटे, ची. महेश दारुंटे, गणेश बर्डे, अमोल दारुंटे, श्री. वाल्मिकी बर्डे, हेमंत दारुंटे, संदीप बर्डे, तेजस दारुंटे, महेश बर्डे, समाधान जेजुरकर, राहुल बर्डे, रवींद्र बर्डे, राहुल भालेराव, मनोज भालेराव व गावातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.



















