नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.२५.१०.१९
येवला- दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असल्या कारणाने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.दि.२५ला धनत्रयोदशी शनिवारी दि.२६ चौथा आठवडा, रविवारी २७ साप्तहिक आणि सोमवारी २८ ला दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार आहे यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होणार आहे दिवाळी असल्यामुळे वेगवेगळ्या खरीदीसाठी नागरिकांची एटीएम वरच मदार असणार आहे. दिवाळीच्या कालावधीत महिनाअखेर असल्याने नागरिकांना बँकाच्या खात्यावरून व्यवहार करणं अपरिहार्य आहे बँकांना दिवाळी सण आणि चौथा शनिवार यामुळे सलग चार दिवस सुट्टी मिळणार आहे. यामुळे बँका तब्ब्ल चार दिवस बंद राहणार आहे ग्राहकांसोबत व्यापाऱ्यांची ही गैरसोय होणार आहे. एटीएम ची रोकड अपुरी पडणार दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजनात मुहूर्त वर अनेकजण घरातील देवी देवतांसह रोख रकमेची ही पूजा करतात त्यासाठी बँकेतून आधीच पैसे काढले जातात शिवाय काही दिवसापासून एटीएम मधुन एका दिवसात केवळ २० हजार रुपयेच काढता येत असल्याने बँक खात्यातून जास्त रक्कम काढण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे बँका सोबत एटीएम मधे रोकड अपुरी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



















