मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.४.११.१९
मुंबई- केंद्र सरकारवर सातत्याने टीकेची झोड उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी, आज पंतप्रधान मोदी सरकारचं अभिनंदन केलं आहे. कारण, भारताने प्रादेशिक सर्वकष आर्थिक भागीदारी कराराच्या (आरसेप) वाटाघाटीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या करारावर स्वाक्षरी करू नये अशी शेतकरी संघटनेची ठोस मागणी होती.
भारत सरकाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी, मागील पंधरा दिवसांपासून आम्ही संपूर्ण देशभर या कराराच्या संदर्भात जनजागृती करून, हा करार शेतकरी, छोटे व्यापारी, वस्त्रउद्योग इत्यादींसाठी कसा घातक आहे, नुकसानकारक आहे हे लोकांना पटवून देत होतो. यात आम्ही यशस्वी झालो आहोत. एकप्रकारचा सामाजिक दबाव तयार केला. जंतमंतरपासून ते मुंबईपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचा ठिकाणी आमची निदर्शनं झाली. शेवटी शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा दबावासमोर कुठतरी सराकरला झुकावं लागलं व आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा लागला. शेट्टींनीस्वतः केंद्रीयमंत्री वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना भेट देऊन कळकळीची विनंती केली होती की, या निर्णयामुळे शेतकरी उद्धवस्त होईल, त्यामुळे हा निर्णय घेऊ नका. अखेर उशीरा का होईना सरकारने याबाबतचा योग्य निर्णय घेतला व या करारावर स्वाक्षरी करायचं टाळलं, त्याबद्दल सरकारच देखील मी अभिनंदन करतो, असं म्हटंल आहे. तसेच, आम्हाला काही सरकारवर विजय मिळवल्याचा टेंभा मिरवायचा नाही, परंतु एक चांगला निर्णय दबावामुळे सरकारने घेतला याचं आम्हाला निश्चितच समाधान वाटतं. असंही ते प्रसार माधमांशी बोलताना म्हणाले.
पंतप्रधानांनी याबाबत ठाम भूमिका घेतलेली आहे. मूळ उद्देशांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आरसीईपी करार हा त्याचा मूळ हेतू प्रतिबिंबित करत नाही. याचे परिणाम निष्पक्ष किंवा संतुलित नाही, असे भारताकडून सांगण्यात आले आहे.



















