• आत्महत्या ग्रस्त शेतकरी संजय भास्कर देशमुख मोहाडी यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून ०१ लाख रुपयांची मदत
नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.६.१०.१९
निफाड- राज्यात अवकाळी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकरयाला नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटीबध्द राहील. मा.ना.रामदासजी आठवले साहेबांनी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंढेसाहेब, राज्यउपाध्यक्ष रविंद्रजी जाधव साहेब प्रियक्रिती त्रिभुवन साहेब यांच्या समवेत निफाड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पहाणी करुन शेतकऱ्यांची भेट घेवुन पंचनामा करुन भरपाई देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
दुष्काळग्रस्त भागातील शेतीची पावसामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी रिपाई युवक जिल्हाध्यक्ष अमोलजी पगारे, ग्रा.जिल्हाअध्यक्ष विनोद जाधव, तालुकाअध्यक्ष शांताराम भाऊ बागुल, उ म.नेते अनिलभाई गांगुर्डे, तालुकअध्यक्ष सुनिलभाऊ रोकडे, शशिभाऊ उबाळे, आयटी सेलचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख महेंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष आकाशजी घुसळे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाकार्याध्यक्ष व आयटी सेलचे नाशिक शहराध्यक्ष सागरभाऊ सोनवणे, अनिल जाधव, वसंतराव वाघ, दादाभाऊ केदारे, नितीन जाधव , समाधान जगताप, सुनिलभाऊ आहिरे, मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष परशरामजी साठे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष कलीमभाई सय्यद, दिंडोरी तालुका अध्यक्ष सागरभाऊ गायकवाड, जिल्हाउपाध्यक्ष प्रदिप नाना गांगुर्डे, मिलिंदअण्णा शेवाळे, कैलासजी शार्दूल, बजरंग भाऊ म्हस्के, योगेशजी लोंढे आदींसह रिपाइंचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



















