पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.१२.१९
देहूरोड- महामानव ,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बुध्द विचारांची पिछेहाट झाल्यानंतर तब्बल १२०० वर्षांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी पुण्याजवळील देहुरोड येथे पुन्हा भारताला गतवैभव मिळवून देण्यासाठी बुध्दरुपाची नव्याने प्रतिष्ठापना केली. या २५ डिसेंबरला या ऐतिहासिक दिवसाला ६५ वर्षे होत आहेत. त्याप्रिर्त्यथ येत्या २५ डिसेंबर रोजी देहुरोड येथिल बुध्दविहारा जवळ एक लाख आंबेडकर अनुयांयानी एकसाथ पांढरे कपडे परिधान करुन सामुहिक बुध्दवंदना म्हणावयाची आहे. सदर कार्यक्रम कोणा एका व्यक्तीचा नसून सामान्य आंबेडकरी जनतेचा आहे. या करिता दि.१०डिंसेबर १९ रोजी भिमसुष्टी पिंपरी येथे महानगरपालिका सदस्यांची मिंटिग संपन्न झाली या करिता मा. सुलक्षणा शिलवंत ,निकिता कदम,बाबा ञिभुवन,बाळासाहेब ओव्हाळ, सागर आंघोळकर,अंबरनाथ कांबळे,संतोष कांबळे उपस्थित होते. या मधे आपल्या भागातुन १लाख अनुयायी उपस्थित करावयाचे निश्चित केले. तसेच कार्यक्रम करिता सहकार्य करण्याचे अश्वासन दिले. या वेळी
मी एक मुस्लिम आहे, मी कुटुंबासहीत येत आहे आपण हि कुटुंबासहीत या आपलं कर्तव्य आहे. आपणही आलेच पाहिजे. असे मत कलिंदर शेख (निर्भिड पत्रकार प्रतिनिधी) यांनी व्यक्त केले.



















