सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.१२.१९
फलटण- न्यू फलटण शुगर वर्क्स लिमिटेड साखरवाडी ता.फलटण जि.सातारा च्या संचालक मंडळाने लेखी दिल्याप्रमाणे गाळप ऊसाची बिले न दिल्याने ३० डिसेंबर १९ रोजी न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी कारखान्यावर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन ऊस उत्पादक शेतकरी यांनी तहसीलदार फलटण यांना दिले आहे. या निवेदनात कळवल्या प्रमाणे १५ नोव्हेंबर १७ ते ३० नोव्हेंबर १७ या कालावधीमध्ये गाळप केलेल्या उसाचे बिल मार्च १८ अखेर देण्यात येईल. तसेच १ डिसेंबर १७ ते १५ डिसेंबर १७ व १६ डिसेंबर ते३१ डिसेंबर १७ या कालावधीतील गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल एप्रिल १८ अखेर देण्यात येईल. तसेच १ जानेवारी १८ ते १ मार्च १८ या कालावधीतील गाळप केलेल्या उसाचे बिल जून १८ अखेर देण्यात येईल. सदरचे बिल २६५० बील रुपये प्रति टन प्रमाणे देण्यात असे लेखी आश्वासन दिलेले आहे.
त्यानंतरच शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केलेला आहे. परंतु लेखी दिल्याप्रमाणे त्यांनी अद्याप उसाचे बिल शेतकऱ्यांना दिलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना बिले मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी तहसीलदार यांना केलेले आहे. अन्यथा ३० डिसेंबर १९ रोजी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला आहे. या निवेदन
दत्तात्रय भगत, समीर सय्यद, देविदास भोसले, दत्तात्रय देवकाते, सलीम पठाण ,भाऊसाहेब गिरंजे, लालासाहेब गिरंजे, महेश गिरंजे, राजेंद्र झांजुरणे, काशिनाथ गारगुंड , पुंडलिक माळवदकर, हनुमंत गलांडे ,आदींच्या सह्यांनी देण्यात आले आहे.



















