चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२९.१२.१९
चिमूर- तालुक्यातील चीचघाट येथील विजय रामभाऊ ढोणे हा युवक आपल्या शेतातून कापूस बैल बंडी ने आणीत असताना वन्यप्राणी आडवे आल्याने बैल बुजाडले त्यामुळे बंडी उलटली तेव्हा विजय बंडीच्या खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला
शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चीचघाट येथील विजय ढोणे (वय ३२) हा आपल्या शेतातून कापूस बंडीत भरून बैलबंडी ने आणीत असताना वन्यप्राणी मुळे बैल बुजाडले त्यामुळे बंडी उलटली आणि विजय चाकाच्या खाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच प.स.सदस्य अजहर शेख यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
वन्यप्राणी मुळे अपघात झाला वन विभाग कडून स्व.गोपीनाथ मुंडे विमा योजने अंतर्गत मृतक विजय ढोणे कुटूंबियांना आर्थिक मदत कृषी विभागाने देण्याची मागणी प.स.सदस्य अजहर शेख यांनी केली आहे.



















