यवतमाळ(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०२.०१.२०२०
यवतमाळ- राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतोय. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस भिजलाय, तूर, हरभरा पिकांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक वाया गेलं जात आहे. हिंगोली जिल्ह्यातही सकाळपासून पाऊस पडतोय. सलग पाच दिवस ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर आज पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातही पाऊस पडतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पाऊस कोसळतोय. काटोल, नरखेड ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपीटही झाल्याचीही माहिती मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.



















