सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०१.२०२०
सातारा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकारी व शेतकरी कर्जमुक्त मेळावा रविवार (दि.०५) दुपारी २ वा. सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. कल्याण रिसॉर्ट, जुनी एमआयडीसी, सातारा अजिंठा चौक ,महिंद्रा शोरूम च्या पाठीमागे हा मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी यांनी केले आहे. पूरग्रस्त शेतकरी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळवून सातबारा कोरा करण्यात यावा. शेतीपंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे. तसेच सातारा जिल्ह्यातील ऊसदराबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी या मेळाव्यात चर्चा करण्यात येणार असून पदाधिकारी निवडी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना फलटण यांच्या वतीने रविवार दि. ०५ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता सोमंथळी येथील मारुती मंदिरात शाखा उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती धनंजय महामुलकर, नितीन यादव यांनी दिली आहे.



















