चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०१.२०२०
नागभीड- तालुक्यातील तळोधी (बा.) जवळील गोविंदपूर गावातील शाळेमध्ये सावित्रीमाई फुले यांची जयंती निमित्य पालक मेळावा,माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. गोविंदपूर माध्यमिक विद्यालय गोविंदपूर या शाळेची स्थापना कधी झाली व शाळा सुरू झाल्यावर कोणकोणत्या अडचणी आल्या व कश्या प्रकारे विद्यार्थी घडले या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.देशमुख सर यांनी शाळेची व्यथा सांगितलं व प्रास्ताविक केले तसेच माजी विद्यार्थी हे शाळेत शिक्षण घेतांना कसे शिकवण मिळाली व आपण त्यातून कसे घडलो या बद्दल माझी विद्यार्थी तथा शिक्षक श्री.राऊत सर यांनी एका कवितेतून सांगितले या मेळाव्याला उपस्थित मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे म्हणून श्री.बोरकर सर सरस्वती विद्यालय कोजबी, राऊत सर, सौ.शिला नेवारे पोलीस पाटील गोविंदपूर, सौ.सुष्मा खामदेवे पं.स.सदस्या, सौ.मीना लोधे, उमाजी खोब्रागडे सरपंच, रमेश आळे, अशोक कुर्वे तंटा मु.अध्यक्ष येणोली, अनिल बीरेवर, नखाते सर, डॉ गिरडकर येणोली, विलास हेडावू सर तथा इतर मान्यवर व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



















