पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०४.०१.२०२०
पुणे- जिल्हा व सत्र न्यायालयात काल ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलेंची १८९ वी जयंती विधायक पध्दतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्रीमती. एम.एम.देशपांडे व मा.श्रीमती मालवणकर सन्मानीय म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अॅड.नितिन कांबळे सर, अॅड.अतुल सोनवणे, अॅड.सागर अरकड, अॅड.संदीप कांबळे, अॅड.ज्योति शिंदे, अॅड. श्रीराम कांबळे, अॅड.सीमा पवार व अॅड.दिलीप गायकवाड यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.ज्योति शिंदे यांनी केले व सावित्रीमाई फुले यांच्या कार्याची माहिती अॅड.डींपल कांबळे, अॅड.सीमा पवार, अॅड.मोहन वाडेकर सर यांनी दिली व आभार अॅड.अतुल सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मल्लेश नडगीरी व अस्लमभाई शेख (चाचा) यांनी विशेष सहकार्य केले.



















